Home Breaking News 🛑 **व्यावसायिकाला मागितली 25 लाखांची खंडणी* 🛑

🛑 **व्यावसायिकाला मागितली 25 लाखांची खंडणी* 🛑

111
0

🛑 **व्यावसायिकाला मागितली 25 लाखांची खंडणी* 🛑
✍पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

लोणी काळभोर/पुणे :⭕एका व्यावसायिकाला 25 लाख रुपयांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दुकान बंद करण्याची धमकी देऊन दोन ग्राहकांना मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी विशाल सुभाष मोहेकर (वय 41, रा. रेव्हेन्यू कॉलनी, जेएम रोड शिवाजीनगर, पुणे) यांनी उरुळी कांचन पोलीस दूरक्षेत्रात फिर्याद दिली. विशाल व त्यांचे भाऊ सागर मोहेकर यांचे कोरेगाव मूळ (ता. हवेली) हद्दीत सोलापूर महामार्गालगत शेवंता कॉम्प्लेक्‍स येथे जेनिथ वाईन्स नावाचे किरकोळ देशी-विदेशी दारू विक्रीचे दुकान आहे. त्यांनी नेहमीप्रमाणे सकाळी 10 च्या सुमारास दुुुकान उघडले.

दुपारी सव्वादोनच्या सुमारास 20 ते 25 वर्षे वयाचा अंगाने मध्यम, तोंडाला रूमाल बांधलेला तरुण त्यांचे जवळ आला व गोरख कानकाटे यांच्या ऑफिसमधून फोन आहे असे म्हणून त्याने विशाल मोहेकर यांचेकडे मोबाईल दिला. त्यावेळी समोरून मी गोरख कानकाटे यांच्या ऑफिसमधून बोलतोय, तुम्ही धंदा सुरू केला आहे. ऑफिसला येऊन भेटायचे, असे सांगण्यात आले. मोहेकर यांनी त्यास नकार दिला. त्यास नाव विचारले असता त्याने मंगेश कानकाटे असे सांगितले व फोन बंद केला.

सकाळी 11 च्या सुमारास मोहेकर बंधू दुकानांत येणासाठी निघाले. त्यावेळी त्यांना दुकानातील मारुती कोळेकर यांचा फोन आला. तो म्हणाला, तोंडाला रूमाल बांधून पाच ते सहा मुले आली होती. त्याचे हातात लाकडी दांडकी, लोखंडी रॉड व कुऱ्हाड होती. दुकान बंद करा, शटर खाली घ्या असे म्हणून त्यांनी दुकानासमोरील दोन गिऱ्हाईकांना मारहाण केली. त्यावेळी सोलापूर रस्त्याने पोलीस गाडी गेल्यामुळे ते सर्वपळून गेले.
धंदा करायचा असेल तर…

दुकानात आलेल्या तरुणाने उद्या सकाळी 25 लाख रुपये कानकाटे यांचे ऑफिसला घेऊन यायचे. या भागात धंदा करायचा असेल, तर तुम्हाला मंगेश कानकाटे याला पैसे द्यावेच लागतील. नाही दिले तर तुम्हाला ठार मारीन, अशी धमकी दिली….⭕

Previous article🛑 **पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन*🛑
Next article🛑 आंबेगाव तालुक्यात कोरोना बाधित रूग्णांसाठी एक हजार बेडची व्यवस्था…! 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here