Home सोलापूर पंढरपूर: भीमा नदीला पुराचा धोका वाढला.

पंढरपूर: भीमा नदीला पुराचा धोका वाढला.

53
0

आशाताई बच्छाव

IMG-20220917-WA0015.jpg

पंढरपूर: भीमा नदीला पुराचा धोका वाढला.

माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

पंढरपूर : उजनी धरन व वीर धरण परिसरात सुरू असलेल्या पावसामूळे धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे धरणामधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे‍. उजनी धरणातून दुपारी 4.30 वाजता धरणातून 91 हजार 600 क्युसेकचा तर वीरधरणातून 43 हजार 377 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे.तर नदीला मिळणाऱ्या लहान मोठ्या ओढ्यातूनही पाणी मिसळत आहे. त्यामुळे भीमा नदी पात्राच्या पातळीत वाढ होत असल्याने नदीकाठाच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे गणेश उत्सवापासून उजनी धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू होता.माञ गणपती विसर्जनानंतर पाऊस कमी झाल्याने निसर्गातही घट करण्यात आली होती. तर मागील दोन दिवसांपासून उजनी व वीर धरण क्षेत्र परिसरात पुन्हा दमदार पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. शुक्रवार दि.16 रोजी दुपारी 4 वाजता उजनी धरणातून भिमा नदीपाञात 91 हजार 600 क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर वीर धरणातून 43 हजार 377 क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे
हा विसर्ग शनिवारी पहाटेपर्यंत पंढरपूर येथे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.. त्यामुळे दगडी पूल, 6 बंधारे पाण्याखाली जाणार आहे तर पुंडलिक मंदिरासह विष्णुपद मंदिराला पाण्याने वेढा दिल्याने मंदिरे पाण्यात अर्धी बुडाली जाणार आहेत. सध्या देखील नदी पात्रात पाण्याच्या पातळी मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्रीपर्यंत चंद्रभागा पात्रातील दगडी फुल तसेच नदीवरील पिराची कुरोली गुरसाळे, पंढरपूर, गोपाळपूर, मुंडेवाडी, पूळूज हे बंधारे पाण्याखाली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे उजनी धरणातून पुन्हा मोठा विसर्ग भीमा नदी पात्रात करण्यात येत आहे.
चंद्रभागा नदी काठाच्या भागातील शेतीला पाण्याचा फटका बसणार आहे तर नदीकाटाच्या ओढ्यामधून देखील पाणी मागे सरकणार असल्याने अनेक ठिकाणची रस्ते वाहतूक बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पंढरपूर ते जुना अकलूज रोडवर शिरढोण येथील ओढ्यावरील पुलावर पाणी येत असल्याने वाहतूक बंद होणार आहे तर पुरस्थिती उदभवली की या भागातील विद्युत पुरवठा बंद करावा लागत आहे
भीमा नदीपाञात 1 लाख 15 हजार क्युसेक विसर्ग आल्यावर 443.600 पाणी पातळी मीटर) नदीकाठी असणाऱ्या व्यास नारायण झोपडपट्टी मध्ये पाणी शिरते. 1 लाख 38 हजार क्युसेक विसर्ग आल्यावर(443.600 पाणी पातळी मीटर) गोपाळपूर येथील नवीन फुलावर पाणी येते.तर 1 लाख 70 हजार क्युसेक विसर्ग आल्यावर(445.500 पाणी पातळी मीटर) संतपेठ झोपडपट्टीतील सखल भागात पाणी येते.तर 1 लाख 97 हजार क्युसेक विसर्ग आल्यावर(446.300 पाणी पातळी मीटर) गोविंदपुरा येथे पाणी येते वाढता निसर्ग पाहता नागरिकांनी संतर्कता बाळगावी. असे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here