Home नाशिक नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ताहाराबाद येथे विविध कार्यक्रम.

नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ताहाराबाद येथे विविध कार्यक्रम.

146

आशाताई बच्छाव

IMG-20220917-WA0022.jpg

नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ताहाराबाद येथे विविध कार्यक्रम.
संदीप गांगुर्डे पिंगळवाडे.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ताहाराबाद शहरात भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्यांकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन.
नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियान या संकल्पनेचे उद्दिष्ट लक्षात घेऊन तसेच मानवी आरोग्याचा समतोल राहावा या उद्दिष्टाने पर्यावरण समतोल राहावा यासाठी ताहाराबाद शहरातील युवकांकडून शहरात विविध हॉटेल, विविध दुकानात ओला कचरा व सुका कचरा टाकण्यासाठी भाजपाकडून साधारण १०० कचरा कुंडीचे वाटप करण्यात आले. यासाठी ग्रामस्थांकडून उस्पुर्त प्रतिसाद मिळाला तसेच शासकीय कार्यालयांच्या आवारातून वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी ताहाराबाद शहराचे भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते मोहन महाजन, भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश महाजन, तालुका उपाध्यक्ष रवी मानकर, शहराध्यक्ष मुकेश साळवे, रवी भामरे, विकीराज भामरे, जीवन भामरे, जितू गोसावी, दत्तात्रेय गवांदे, प्रीतम साळवे, गौरव भामरे, प्रशांत नंदन, सागर मानकर, रवी सोनवणे, निलेश नंदन, बाळ ब्राह्मणकर, देवेंद्र चौधरी, योगेश घरटे, संदीप नहिरे, दिनेश भामरे, भूषण पगार, मयुरी पाठक, कविता साळवे, प्रियांका साळवे, आदी महिला पुरुष उपस्थित होते. ताहाराबाद शहरात नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.

Previous articleपंढरपूर: भीमा नदीला पुराचा धोका वाढला.
Next articleआज ७५ वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.