Home बुलढाणा महाराष्ट्र सरकारच्या चूकीच्या धोरणाचा! संग्रामपूर राष्ट्रवादीकडून निषेध.- जिल्हाधिकारी बुलढाणा यांना दिले निवेदन.

महाराष्ट्र सरकारच्या चूकीच्या धोरणाचा! संग्रामपूर राष्ट्रवादीकडून निषेध.- जिल्हाधिकारी बुलढाणा यांना दिले निवेदन.

82
0

आशाताई बच्छाव

IMG-20220917-WA0020.jpg

महाराष्ट्र सरकारच्या चूकीच्या धोरणाचा! संग्रामपूर राष्ट्रवादीकडून निषेध.-
जिल्हाधिकारी बुलढाणा यांना दिले निवेदन.

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)

संग्रामपुर :- महाराष्ट्रच्या आर्थिक उन्नतीसाठी यूवकांना रोजगारासाठी व राज्याच्या सर्वागीत प्रगतिसाठी सेमीकंडक्टर व डिस्प्ले फँब्रीकेशनचा प्रकल्प महत्वाचा आहे. त्या बाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधी पक्षाची भूमिका तसेच राज्यातील जनतेची भूमिका मूख्यमंत्री यांना दिलेल्या पत्रात विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी सूचित केली आहे. सध्याचे जे घातलेले मोठमोठे प्रकल्प जसे वेदांत ( फाक्सकाँन) सारखे लाखो तरूणांना रोजगार देणारे प्रकल्प सध्याच्या शिंदे सरकारच्या काळात दिवसाढवळ्या गुजरात सारख्या राज्यात पळून नेण्यात येत आहेत. केंद्र सरकारच्या दबावांमध्ये मुख्यमंत्री काम करत असून लाखो लोकांना कामगार देणारे प्रकल्प जर राज्याबाहेर गेले तर राज्याचे फार मोठे नुकसान होणार आहे. शासनाचे चुकीचे धोरण यासाठी कारणीभूत आहे यामुळे अशाप्रकारे मुंबई सह महाराष्ट्र राज्याचे महत्त्व कमी होत आहे.अशा प्रकारे शासनाचे भेसाळ नियोजन शून्य कारभाराचा राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने निषेध करण्यात येत असून .असेच प्रकार भविष्यात घडतील तर राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात य़ेईल याची दखल घ्यावी व शिंदे सरकारच्या चुकीच्या धोरणाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तहसीलदार संग्रामपूर मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संग्रामपुर तालुका अध्यक्ष संजय पाटील मारोडे, अरुण निंबोळकार तालुका कार्याध्यक्ष, अमोल व्यवहारे युवक तालुकाध्यक्ष, सोपान रावणकार युवक तालुका कार्याध्यक्ष, राजेंद्र पाटील दाभाडे, प्रशांत भरडक,पप्पू पठाण, अंकुश कड सोशल मीडिया तालुकाध्यक्ष, नारायण ढगे माजी तालुकाध्यक्ष, दुर्गासिंग सोळंके प्रसिद्धीप्रमुख, तुकाराम घाटे, बाळू साबे, अमित वर्गे, अभिनव रावणकार, रोशन पाटील मारोडे, संतोष नायसे, सुरेश साबे, अरुण मुरुख, पंजाबराव पाटील, सुनील खरात, प्रमोद सोळंके व बहुसंख्यक संग्रामपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here