• Home
  • 🛑 *पोलिसी खाक्या दाखवताच त्याने दिली पत्नीच्या खुनाची कबूली*🛑

🛑 *पोलिसी खाक्या दाखवताच त्याने दिली पत्नीच्या खुनाची कबूली*🛑

 

🛑 *पोलिसी खाक्या दाखवताच त्याने दिली पत्नीच्या खुनाची कबूली*🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

पुणे :-⭕राजगुरूनगर : राजगुरुनगर येथे संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळलेल्या परप्रांतीय विवाहितेचा, नवऱ्यानेच चारित्र्याच्या संशयावरून काटा काढल्याचे खेड पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले.

पूजा पप्पू चौहान ( वय २०) असे मृत पत्नीचे नाव आहे. तर पप्पू रामउजागर चौहान ( वय २१, सध्या रा. तिन्हेवाडी रोड, राजगुरूनगर; मूळ रा.  कशेडी, रामपूर, जि. बदनापूर, उत्तर प्रदेश) असे संशयित आरोपी असलेल्या पतीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक  केली असून, न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दांपत्याने आठ महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशातच आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. दोन महिन्यांपूर्वी ते राजगुरूनगर येथे कामानिमित्त आले आणि तिन्हेवाडी रस्त्यावरील चाळीसखोली चाळीत भाड्याने राहत होते. पती पप्पू इमारतींना प्लॅस्टर ऑफ पॅरिस लावण्याचे काम करत होता.

पत्नी अनेकदा घराबाहेर जाई, म्हणून तिच्या चारित्र्याच्या संशय घेऊन, तो सतत तिच्याशी भांडत होता.रविवारी दुपारी ४ वाजल्यानंतर, असेच भांडण झाल्यावर त्याने ओढणीने गळा आवळून पूजाचा खून केला आणि घराबाहेर निघून गेला.

संध्याकाळी घरी आल्यावर ती बेशुद्ध पडल्याचा बनाव केला व स्वतःही बेशुद्ध पडण्याचे नाटक केले. तिला दवाखान्यात नेल्यावर मृत घोषित करण्यात आले.शवविच्छेदन अहवाल आल्यावर, तिचा गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच, त्याने खूनाची कबुली दिली.

पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निलेश बडाख यांनी या प्रकरणाचा छडा लावला….⭕

anews Banner

Leave A Comment