• Home
  • 🛑 मंडई- पुणेकरांच्या भावविश्वाचा एक कप्पा 🛑

🛑 मंडई- पुणेकरांच्या भावविश्वाचा एक कप्पा 🛑

🛑 मंडई- पुणेकरांच्या भावविश्वाचा एक कप्पा 🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

पुणे :⭕पुण्याचे वैभव महात्मा फुले मंडई ही १३४वर्षे पूर्ण होऊन १३५व्या वर्षात पदार्पण*
इ. स.पूर्व १८८०साली पुण्याची लोकसंख्या ९०,००० होती पुण्यात बंधीस्त जागेत एक मोठी मंडई उभी झाली पाहिजे, म्हणून सण १८८२ साली पुणे नगर पालिकेत ठराव झाला त्यात महात्मा फुले व चिपळूणकरांनी विरोध केला पण बहुमताच्या जोरावर ठराव पास झाला,
सरदार खासगीवाले यांची बाग वजा जागा ही ४ एकर ४०,०००रुपयांना खरेदी केली, व त्यावेळेचे बांधकाम अभियंते वासुदेव बाप्पूजी कानिटकर यांनी केले या कामासाठी ३लक्ष रुपये खर्च आला..

या कामासाठी वाहतूक खर्च कमी व्हावा म्हणून पिंपरी चिंचवड येथून सिमेंट चुना, बेसॉल्ट दगड आणले, ह्या वरील खांब हे ग्रीक पानांची नक्षीत आहे व रोमन शैली मध्ये बांधकाम झाले, अष्टकोन असून मध्यभागी कळस आहे तो ८०फुट उंच असा आहे,
१ ऑक्टोबर १८८६ साली मुंबईचे गव्हर्नर जनरल रे यांच्या हस्ते उद्घाटन झाले, त्यांच्याच नावावरून रे मार्केट नाव पडले पुढे १९३९/४० मध्ये आचार्य अत्रे यांनी महात्मा फुले मंडई असे नामकरण केले.

मंडई ला मंडई विद्यापीठ हे नाव काकासाहेब गाडगीळ यांनी दिले कारण इथे येणारा असो की व्यवसायकरणारा असो हा कधीच व्यवहारात चुकत नाही.
त्यावेळी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू,लोकमान्य टिळक,आचार्य अत्रे,देशभक्त जेधे इत्यादी मोठ मोठ्या लोकांची भाषणे होईची,
इथे रात्री सर्व राजकीय पक्षांचे पुढारी कार्यकर्ते, पत्रकार अधिकारी वर्गातील लोक यांचा कट्टा भरत असे त्यावेळचा पुण्यातील पहिला कट्टा,
१२ महिन्याचे सण त्यासाठी होणारी गर्दी, सर्कस सिनेमा गृह यामुळे पुण्याचे केंद्र बिंदुच मानले जायचे..

गणेशोत्सव हा जगप्रसिद्ध असा येथील श्री शारदा गजाननाची मूर्ती ही डोळ्यांचे पारणे फेडते…⭕

anews Banner

Leave A Comment