• Home
  • 🛑 मराठा आमदारांना आरक्षण नकोय….! प्रकाश आंबेडकर 🛑

🛑 मराठा आमदारांना आरक्षण नकोय….! प्रकाश आंबेडकर 🛑

🛑 मराठा आमदारांना आरक्षण नकोय….! प्रकाश आंबेडकर 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

पुणे :⭕सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवर स्थगिती आणल्यानंतर प्रथमच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे. राज्यातील श्रीमंत मराठा आमदारांना आरक्षण नको असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. राज्यात २८८ आमदारांपैकी १८२ आमदार हे मराठा समाजाचे असून देखील गरीब मराठ्याला आरक्षण मिळवून देत नसल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

हे श्रीमंत आमदार गरीब मराठ्यांसह इतर सर्वांना व्यवस्थेतून बाहेर ठेवत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

गरीब मराठा आणि श्रीमंत मराठा असा आरक्षणाचा घोळ असून गरीब मराठ्यांनी आरक्षणासाठी बंड करावं…

असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे…⭕

anews Banner

Leave A Comment