Home गडचिरोली युवकांनो आम आदमी पक्षात प्रवेश करा…कैलाश शर्मा.

युवकांनो आम आदमी पक्षात प्रवेश करा…कैलाश शर्मा.

63
0

आशाताई बच्छाव

IMG-20220605-WA0022.jpg

युवकांनो आम आदमी पक्षात प्रवेश करा…कैलाश शर्मा.                                                                गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवि मराठा न्युज नेटवर्क)

दिल्ली आणि पंजाब मध्ये श्री अरविंद केजरीवाल यांच्या मार्गदर्शनात आम आदमी पक्षाची सरकार आल्यापासून जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात येत असल्यामुळे ,तसेच जनतेच्या अडी अडचणी जाणून घेत आवश्यक ती उपाय योजना प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामीण आणि शहरी भागात, आम आदमी पक्षाच्या वतीने केली जात आहे.
गडचिरोली शहरात अनेक पक्षानी नगर पालिकेत आपली सत्ता स्थापित करून फक्त सत्तेचा दुरुपयोग केला असल्याची भावना शाजरीलील नागरिकांमध्ये निर्माण झालेली आहे.
शहराचा विकास करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध असताना सुध्दा शहरातील पाणी टंचाई, साफ सफाई न होणे, नालीची गाळ नियमित न काढणे, आरोग्य केंद्रात रुग्णांची गैरसोय तसेच नगर पालिकेच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या काही प्राथमिक शाळेत बांधकाम जीर्ण झालेल्या अवस्थेत विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता,अशा अनेक कारणांमुळे, नगर पालिकेच्या प्रशासनावर जनतेत नाराजी पसरली असून, अशा गैरसोयी वारंवार होत असल्याने नगर पालिकेच्या कार्यप्रणाली वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
दिल्ली आणि पंजाब मध्ये ज्या प्रमाणे सुख सोई उपलब्ध करून देण्यात येतात,त्याच प्रमाणे गडचिरोली शहरात सुध्दा त्या सुविधा लोकांना मिळाल्या पाहिजे यासाठी आम आदमी पक्षाच्या वतीने प्रयत्न केले जात आहे.
जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी शहरातील नागरिकांनी आपला पाठिंबा आम आदमी पक्षाला देण्याची विनंती आम आदमी पक्षाच्या वतीने केली जात आहे.
शहरातील युवक,युवतींनी आपल्या अभ्यासपूर्ण पद्धतीने आम आदमी पक्षाच्या विचार सरणीचा फायदा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीआम आदमी पक्षात प्रवेश करून जिल्ह्यातील प्रत्येक शहरातील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
गडचिरोली नगर पालिकेत करोडो रुपयांचा निधी देण्यात आला असून सुध्दा,शहरतील अनेक ठिकाणी विकासकामांना खीळ बसली असल्याचे दिसून आले आहे.
एकीकडे फुटपाथ वरील व्यावसायिक लोकांचे अतिक्रमण काढण्याची पद्धत,आणि दुसरीकडे महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर निरंतर होत असलेली चार,पाच मजली इमारती ची अवैध बांधकामे सुरू असणे, आणि महामार्गाच्या दोन्ही बाजूने होत असलेल्या नाली बांधकामात अडसर होणाऱ्या काही अवैध बांधकामांना हटविताना अंतराचा भेदभाव करणे,अशा प्रकारची आगळीवेगळी भूमिका नगर पालिकेच्या वतीने घेण्यात आल्याने तसेच गडचिरोली शहरातील बिघडलेली वाहतूक, व त्यामुळे झालेल्या अपघातात अनेकांचे जीव गेल्यानंतर सुध्दा नगर पालिकेच्या वतीने कोणतीही उपाय योजना न झाल्याने शहरातील नागरिकांनी आपला पाठिंबा आम आदमी पक्षाला देऊन पक्षात प्रवेश घेत,पुढील निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून देण्यासाठी मदत करण्याची विनंती आम आदमी पक्षाच्या शहर कार्यकारिणी तर्फे करण्यात आली आहे.

Previous article☆पत्रकार सय्यद मुजीब यांना `राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार` प्रदान
Next articleअजमीर सौंदाणेत आय.पी.एस.प्रतापराव दिघावकर यांचा नागरी सत्कार संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here