Home नाशिक नमन एज्युकेशन सोसायटी’ संचलित रेंनबो इंटरनॅशनल स्कूल नांदगाव यांची रेल्वे स्टेशन ला...

नमन एज्युकेशन सोसायटी’ संचलित रेंनबो इंटरनॅशनल स्कूल नांदगाव यांची रेल्वे स्टेशन ला प्रत्यक्ष भेट. नांदगांव प्रतिनिधी-अनिल धामणे आज विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत

86
0

आशाताई बच्छाव

IMG-20220723-WA0058.jpg

‘नमन एज्युकेशन सोसायटी’ संचलित रेंनबो इंटरनॅशनल स्कूल नांदगाव यांची रेल्वे स्टेशन ला प्रत्यक्ष भेट. नांदगांव प्रतिनिधी-अनिल धामणे
आज विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत
नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री.संजय बागुल सर, उपाध्यक्ष सौ.सरिता बागुल मॕम ,रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सुर्यवंशी मॕम यांच्या नेतृत्वाखाली ही प्रत्यक्ष भेट आयोजित करण्यात आली.
नविन शैक्षणिक वर्षात 23 जुलै रोजी शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वर्ग तसेच सर्व विद्यार्थ्यांनी रेल्वे स्टेशनला प्रत्यक्ष भेट दिली. विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात रेल्वे स्टेशन तसेच तेथील कार्यपद्धती याची माहिती असणे आवश्यक आहे. फक्त पुस्तक किंवा चित्रांवरून माहिती सांगणे हे मुलांच्या जास्त लक्षात आले नसते त्यामुळे प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन मुले जेव्हा बघतात तेव्हा ते त्यांच्या जास्त स्मरणात राहतात. म्हणूनच मुलांना प्रात्यक्षिक ज्ञान देण्यासाठी ही प्रत्यक्ष भेट घडवून आणण्यात आली. सर्वप्रथम तिकीट बुकिंग ऑफिस, नंतर ऑपरेटर ऑफिस, आर पी एफ ऑफिस, वेटिंग रूम यांची माहिती देऊन त्यांची कार्यपद्धती मुलांना समजून सांगण्यात आली. श्री. विश्वजित मीना सर यांनी प्रत्यक्षात भेट दिली. श्री. सर्वेश यादव सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्यांनी प्रत्यक्षात आम्हाला सर्व ऑफिस दाखवून त्याबद्दल मुलांना सर्व माहिती सांगितली. तसेच तेथील सर्व कर्मचारी वर्गाकडून मुलांना बिस्कीट पुडा देऊन मुलांचे कौतुक करण्यात आले.
ही भेट उत्तम रित्या घडवून आणण्यात रेंनबो इंटरनशनल स्कूलच्या शिक्षिका जयश्री चौधरी मॅम, प्रिया गरूड मॅम,रूपाली शिंदे मॅम ,एडना फर्नांडिस मॅम ,मोनाली गायकवाड मॅम,सुषमा बावणे मॅम , चैताली अहिरे मॅम, रोहिणी पांडे मॅम, तसेच मदतनिस छाया आवारे, मंजू जगधने, रविंद्र पटाईत ,तसेच ड्रायव्हर मंगेश शिंदे, विनोद चौधरी, बाळू गायकवाड, सागर कदम, नासीर खान पठाण, चंद्रकांत बागूल, यांनी अतोनात मेहनत घेऊन आजची ही भेट उत्तम रित्या घडवून आणण्यात आली.

Previous articleओबीसी आरक्षण पंढरपुरात भाजपचा पेढे वाटून जल्लोष
Next articleबागलाण तालुक्यातील अजमिर सौंदाणे येथे वृक्ष दिंडी संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here