Home Breaking News 🛑 लग्नाची स्थळं नाकारली! तिला..व्हायचं होतं तहसिलदार 🛑 ✍️ ( विजय...

🛑 लग्नाची स्थळं नाकारली! तिला..व्हायचं होतं तहसिलदार 🛑 ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

115
0
  1. 🛑 लग्नाची स्थळं नाकारली!
   तिला..व्हायचं होतं तहसिलदार 🛑
   ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

   विशेष बातमी :⭕ “एमपीएससी’ परीक्षेत तिची तहसिलदारपदासाठी निवड झाली आहे. तहसिलदार होण्याचे स्वप्न ती पाहत होती. सलग चारवेळा या पदाने तिला हुलकावनी दिली. कधी प्रिलीयमला पास तर फायनलमध्ये नापास असे चालत राहिले. शेवटी पाचव्यांदा ती दोन्हीकडे पास झाली. अर्थात मुलाखतही चांगली झाली. सगळाचं योग जुळून आला आणि यश खेचून आणलं.
   ग्रामीणभागातील मुलं शहरी जीवनात टिकत नाहीत. त्यांना इंग्रजी, हिंदी येत नाही. काहीशी लाजरीबुजरी असतात. असा समजगैरसमज आहे. पण, आता चित्र तसे राहिले नाही. गावगाड्यात अडकले तर प्रगती खुंटेल. उंबरठा ओलांडला तर नवे जग पाहता येईल. स्पर्धा करावी लागेल हे आजच्या युवापिढीला चांगलं कळलंय.
   म्हणूनच नूतन सारखी गावखेड्यातील मुलगीही यशस्वी होताना दिसत आहे.

   वास्तविक नूतन नागावातून पुण्यात आली ते अधिकारी बनण्याचे स्वप्न घेऊन. वडीलांची घरची परिस्थिती तशी बेताचीच. दहा बाय दहाची खोली, एक एकर जमीन, संसाराचा गाडा शेतावर हाकता येत नाही म्हणून माधवनगरला हातमाग कामगार म्हणून नोकरी धरली. स्वत:ला कितीही कष्ट पडले तरी चालतील पण, मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं हे नामदेव पाटील यांनी ठरवलं होतं. मुलगी कॉम्पुटर इंजिनिअर झाली. इतक्‍या मोठ्या पदावर पोचलेली नूतन ही पहिली मुलगी आहे.

   आता मुलगीला नोकरी लागेल. चांगलं स्थळ आलं की लग्न करून टाकायचं असं ठरवलं होतं. याविषयी नूतनची आई संगीता आणि वडील नामदेव यानीं सांगितले की मुलीला चांगली स्थळं येत होती. मुलगी लग्नाला तयार होईना म्हणून आम्ही स्थळं नाकारत होतो. चांगली स्थळ नाकारताना वाईट वाटायचं. डॉक्‍टर, इंजिनिअर नको तर कोणाशी लग्न करायचंय असे वाटायचं. पण, नूतन म्हणाली,”” मला अधिकारी व्हायचं आहे. इंजिनिअरिंग करून नोकरी नाही करायचीं मला. !”
   शेवटी तिच्या लग्नाचा विचार आम्ही सोडला. तिला हवे ते करण्याचे स्वातंत्र्य दिले. ती पुण्यात गेली. मुलगी म्हणून आम्ही कधीच दुय्यम स्थान दिले नाही.

   इंजिनिअर होऊन तेथेच ती थांबली नाही, तर स्पर्धा परिक्षेची तयारी करू लागली. तिला शासकीय अधिकारी व्हायचं होतं. या यशाबाबत बोलताना नूतन म्हणाली,” 2015 पासून मी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होते. पुणे विद्यापिठात दोन वर्षे स्पर्धा परिक्षेचा अभ्यास केला. 2018 मध्ये मला सायबर क्राईम ब्रॅंच सांयटीफिक असिसन्टट म्हणून संधी मिळाली होती. पण, मी ती नाकारली. पुन्हा अभ्यास सुरू केला. ते तहसिलदार होण्यासाठीच. चारवेळा अपयश आल्यानंतर मला असे वाटले होते की आता येथे थांबावे. आईबांबांना आणखी किती खर्च करायला लावायचा.”

   जेव्हा मी थांबण्याचा निर्णय घेतला. मी ज्यावेळी खचले त्यावेळी आईबाबा माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिले. मी पुन्हा अभ्यासाला तयारी केली. मोठी जिद्द घेऊनच.अधिक कष्ट घेऊ लागले. रात्री जागून काढल्या. कशात कमी पडतो याचा विचार केला. घरची परिस्थिती माहित होती. वडील हातमागकामगार आहेत ते आपल्यासाठी किती कष्ट घेतात. राबतात. हे मी कधीच विसरले नाही. विसरणेही शक्‍यही नाही. म्हणूनच यश मिळाले. अर्थात या यशाचे श्रेय माझे बाबा नामदेव आणि आई संगितालाच जाते.
   नागावकवठ्याची मुलगी तहसिलदार झाली हे वाक्‍य माझ्या कानावर पडते ! तेव्हा मला निश्‍चितच आनंदाबरोबरच अभिमान वाटतो. मला ग्रामीण भागातील मित्र-मैत्रिनींना हेच सांगायचं आहे की खूप अभ्यास करा. परिश्रम करा. स्पर्धेत टिकण्यासाठी भरपूर वाचन आणि अभ्यास हा केलाच पाहिजे. भाषेवर प्रभुत्व मिळवा तर यश लांब नाही.

   सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्नाची अनेक स्थळ मी नाकारली. ती नाकारली नसती तर माझ लग्न झालं असतं चारचौघींप्रमाणे. पण, अधिकारी होण्याचं स्वप्न पाहत होते. ते पूर्ण करण्यासाठी वडीलांनी मोठा आधार दिला. स्वप्न पूर्ण झाले आहे. अधिकारी होणार आहे. आता लग्न करणं अवघड नाही असेही नूतन सांगून जाते…⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here