Home Breaking News ‘भाईजान’च्या मदतीसाठी काँग्रेस आमदाराचा पुढाकार! मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ...

‘भाईजान’च्या मदतीसाठी काँग्रेस आमदाराचा पुढाकार! मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

91
0

🛑 ‘भाईजान’च्या मदतीसाठी काँग्रेस आमदाराचा पुढाकार! 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 21 जून : ⭕ अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने काही दिवसांपुर्वी वांद्रे येथील त्याच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर अनेक तर्क वितर्क लावले जात आहे. सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या नसून, एक प्रकारे हत्या असल्याचा आरोप अभिनेत्री कंगना राणावत हिने केल्यानंतर सुशांतच्या चाहत्यांनी बॉलिवूडच्या घराणेशाहीवर आणि विशेषतः भाईजान अर्थात सलमान खान याच्यावर सोशल मीडियावर टीका करायला सुरुवात केली आहे. तसेच सिनेसृष्टीतील घराणेशाहीसाठी सलमान खानला जबाबदार धरले जात आहे.

त्याच्यावर आरोप असे करु नका मात्र आता सलमान खानच्या मदतीला काँग्रेस आमदार झिशान सिद्धिकी धावून आले आहे. सलमान एक दिलदार व्यक्ती असून त्याच्यावर असे आरोप करु नका, अशी विनंती झिशान यांनी व्हिडिओ करत केली आहे. दरम्यान बाबा सिद्धिकी आणि सलमानचे घरगुती संबंध आहेत. तसेच बाबा सिद्धीकींच्या घरात इफ्तार पार्टी असो किंवा अन्य कार्यक्रम सलमान खान आवर्जून हजेरी लावतो. मात्र आता सलमानवर टीका होताना बाबा सिद्धीकी यांचे पुत्र आणि आमदार झिशान धावून आले आहेत.

असा दिलदार माणूस कोणाचं वाईट कसं करु शकतो दरम्यान, झिशान सिद्धिकी यांनी सलमानचे कौतुक करण्यासाठी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी २०१४ चा एक किस्सा सांगितला आहे. कोणालाही न कळता मदत कशी करायची? हे त्यावेळी सलमानने आपल्याला शिकवले होते. असा दिलदार माणूस कोणाचं वाईट कसं काय करु शकतो? असा प्रश्न त्यांनी या व्हिडिओद्वारे टीकाकारांना विचारला आहे. सिद्धिकी यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान यापूर्वी ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’ (FWICE) ही कामगारांची संघटना देखील सलमानच्या मदतीसाठी पुढे सरसावली होती. सलमानच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत, असं त्यांनी एका पत्रकाद्वारे म्हटलं होतं.⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here