Home उतर महाराष्ट्र अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान

327
0

राजेंद्र पाटील राऊत

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान
(युवराज देवरे युवा मराठा न्यूज नेटवर्क)
महिन्यापासून सुरु झालेला पाऊस पावसाळा संपला तरी काही पिच्छा सोडत नाहीये. ऐन डिसेम्बर महिन्यात देखील पाऊस हजेरी लावतो आहे. पुढचे दोन तीन दिवस देखील राज्यात असाच पाऊस हजेरी लावणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. पाऊस, धुके यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर मात्र परिणाम होतो आहे. याची झळ शेतकऱ्यांना बसणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे.
यंदा सर्वच हंगामातील पिकांवर निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम पाहवयास मिळालेला आहे. दर पंधरा दिवसांनी वातावरणात होणारा बदल शेती व्यवसायासाठी धोक्याची घंटा मानला जात आहे. कारण शेतकऱ्यांचे परिश्रम तर निष्फळ ठरत आहेतच पण अधिकचा पैसा खर्ची करुन उत्पादन पदरी पडत नाही ही मोठी शोकांतिका आहे. आता फळबागासह, रब्बी हंगामातील पिके आणि कांद्यावरही किडीचा प्रादुर्भाव वाढणार असल्याने शेती करावी कशी असा सवाल शेतकऱ्यांसमोर आहे. साध्यावावरात असलेल्या कांदा पिकावर देखील धुके आणि पावसाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. धुक्यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
रब्बी हंगामातील कांद्यावर मावा
अवकाळीमुळे रब्बी हंगामातील कांद्यावर मावा , करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. बुधवारी सकाळी लासलगाव, निफाड,चांदवड – देवळा,मालेगाव, या भागात रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांवरही किडीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आता त्याच्या नियोजनासाठी शेतकऱ्यांना अधिकचा पैसा खर्ची करावा लागणार आहे.
फळबागांवरही अवकाळीचा परिणाम
प्रत्येक हंगामातील पिके ही अंतिम टप्प्यात असतानाच पावसाने हजेरी लावलेली आहे. त्यामुळेच खरीप पाठोपाठ रब्बी हंगामही धोक्यात आहे. आता कुठे पिकांची उगवण झाली असताना ढगाळ वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. पिक उगवताच किडीचा प्रादुर्भाव होत असल्याने त्याचा वाढीवर आणि भविष्यात उत्पादनावरही परिणाम होणार आहे. त्यामुळे महागडी औषधे घेऊन फवारणी करावी लागत आहेत
या अशा वातावरणामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.शेतकऱ्याला सर्व बाजूंनी निराशा पदरात पडत आहे.
शासनाने शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीर पणे उभे राहून पिकांचे पंचनामे न करता सरसकट नुकसान भरपाई द्यावी तरच राज्यातील शेतकरी सुखी समाधानी राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here