Home नांदेड नायगाव तालुक्यातील कृष्णूरची कीर्ती गोल्ड कंपनी की कीर्ती दालमील लिमिटेड कंपनी ?...

नायगाव तालुक्यातील कृष्णूरची कीर्ती गोल्ड कंपनी की कीर्ती दालमील लिमिटेड कंपनी ? विविध संघटनेची चौकशी करण्याची मागणी

191
0

राजेंद्र पाटील राऊत

नायगाव तालुक्यातील कृष्णूरची कीर्ती गोल्ड कंपनी की कीर्ती दालमील लिमिटेड कंपनी ? विविध संघटनेची चौकशी करण्याची मागणी — नायगाव प्रतिनिधी निळकंठ मोरे पाटील (युवा मराठा न्युज)
——————————————————————–
नायगाव तालुक्यातील कृष्णूर येथील औद्योगिक वसाहतीत असलेली किर्ती गोल्ड कंपनी की किर्ती दालमील कंपनी ? यांची चौकशी करण्याची विविध संघटनेची मागणी असून किर्ती गोल्ड कंपनी ही कित्येक वर्षापासून चालू असून ह्या कंपनीच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करून त्या कंपनीवर कारवाई करण्यात यावी असी मागणी करण्यात येत असून कारवाई नाही झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सोनालीताई हंबर्डे यांच्यासह अंकुशकुमार देगावकर यांनी एका निवेदना द्वारे वरिष्ठाना कळविण्यात आले आहे

तालुक्यातील कृष्णूरची अद्योगिक वसाहतील किर्ती गोल्ड ही मोठ्या प्रमाणात सोयाबीन अनेक दलाला मार्फत खरीदी करत असताना सुद्धा विविध विभागातील प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकून कंपनी चालवित असल्यामुळे या कंपनीची चौकशी करण्यात यावी असी
मागणी विविध संघटनांच्या वतीने केल्या जात असून नायगाव तालुक्यातील पंचताराकित वसाहतीमध्ये कित्येक वर्षापासून कीर्ती गोल्ड कंपनी शेतकऱ्यांचे मोठे किर्ती गोल्ड कंपनीच्या नावाखाली सोयाबीन खरीदी करत असतो आणि दाल मिलच्या नावाखाली ऑइलमिल
चालवित असल्यामुळे त्या कंपनी चौकशी करण्याची मागणी होत आहे

कृष्णूर कीर्ती गोल्ड कंपनीच्या असलेल्या गोदामात सोयाबीनच्या थप्या मारल्याचे सांगण्यात आले
शासनाचा काही प्रमाणात जीएसटी टॅक्स चुकून कुंटूर कृषी उत्पन्न बाजार समितीला कमी प्रमाणात टॅक्स भरते व खरेदी विक्री कमी झाल्याचे दाखवून कंपनीने शेतकऱ्याची लूट करताना दिसून येते लातूर हिंगोली आदी विविध ठिकाणी कंपन्या चालू असून
आयकर विभाग व वन विभागाच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम ही कंपनी करीत असून किर्ती गोल्ड कंपनी मधून निघालेल्या दूषित पाण्यामुळे गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले तर जनावरे दगावली होती

किर्ती गोल्ड कंपनीच्या दूषित हवेमुळे परिसर ऑक्‍सिजन ही दूषित मिळत असून त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचे अनेकातुन बोलल्या जात असले तरी निवेदन कर्त्यांचे ही म्हणे असूम किर्ती गोल्ड दालमिल अँड फूड प्रोडक्शनच्या नावाने शासनाकडून विविध योजनांचा लाभ घेत असून ठिकाणी मात्र दालमिल चालूच नाही व त्यावर प्रक्रिया केली जात नसल्याचे दिसून येत असून दालमिल च्या नावावर लातूर येथून मोठ्या प्रमाणात व्यवहार होत असते असे ही निवेदनातं नुमूद करण्यात आले असून कीर्ती गोल्ड कंपनीच्या इंधनासाठी परिसरातील अवैधरित्या तोडलेले लाकूड खरेदी केल्यामुळे नायगाव तालुक्याला वाळवंटाचे स्वरूप आल्याचे दिसून येत असूनया बाबतीत निसर्गप्रेमीनी चिंता व्यक्त केली असली विविध विभागा कडून कंपनीवर कारवाई करण्यात यावी असी मागणी अनेक संघटनेच्या मार्फत होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here