Home नांदेड कल्याण के टी टोलनाका लाखो रुपयाची टोल वसुली होत असतानाही कहाळा कल्याण...

कल्याण के टी टोलनाका लाखो रुपयाची टोल वसुली होत असतानाही कहाळा कल्याण टोलनाक्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बेजबाबदारपणामुळे -घुंगराळा येथे प्रवासी निवारा बांधलाच नसल्यामुळे जनतेत संताप —

237
0

राजेंद्र पाटील राऊत

कल्याण के टी टोलनाका लाखो रुपयाची टोल वसुली होत असतानाही कहाळा कल्याण टोलनाक्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बेजबाबदारपणामुळे -घुंगराळा येथे प्रवासी निवारा बांधलाच नसल्यामुळे जनतेत संताप —
———————————————– नायगाव तालुका प्रतिनिधी निळकंठ मोरे पाटील (युवा मराठा न्युज)
नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या कहाळा टोलनाक्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बेजबाबदार पणामुळे मौजे घुंगराळा येथे टोलनाका चालकांनी दैनंदिन लाखो रुपयाची टोल वसुली करून सुद्धा अनेक ठिकाणी प्रवाशासाठी प्रवासी निवारा बांधलाच नसल्यामुळे ग्रामीण भागतील तमाम जनतेसह प्रवाशातून संताप व्यक्त केला जात असल्यामुळे प्रोजेक्ट मॅनेजर यांची मनमानी वाढली असल्याचे जनतेतून बोलल्या जात आहे

तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम आणि टोलनाका धारकांनी फक्त टोल वसुली करण्याची धावपळ करत असतें परंतु शासनाच्या डोळ्यात धूळ टाकून कल्याण टोल धारकांनी शासन दरवर्षी झाडे लावा झाडे जगवा असे धोरण आवंलबते असे असताना सुद्धा टोलनाक्याच्या ढिसाळ यंत्रणेमुळे राज्य महामार्गावर असलेल्या डिव्हायडरवर नांदेड ते देगलूर,नरसी ते बिलोली,नांदेड ते मुखेड,अशा महामार्गावर वृक्षांची लागवड केली नसल्यामुळे सध्याच्या परिस्थितीत डिव्हायडरवर झाडा ऐवजी गवतचगवत असल्याचे दिसून येत असल्यामुळे अनेक वेळा या मार्गावर रात्री बेरात्री अपघात होताना दिसून येत आहेत

काहाळा टोलनाका धारकांनी आतापर्यंत राज्य महामार्गावर वळणाच्या ठिकाणी दिशा फलक लावलेला नाही,स्वच्छालय बांधले नाही, लघवी करण्यासाठी लोकांना उघड्यावर जावे लागत असल्याचे दिसून येत असल्यामुळे बेजबाबदार टोलनाका धारकांची प्रशासनाने कान उघडी करावी असे जनतेतून मागणी होताना दिसून येत असून सदरचे सार्वजनिक बांधकाम विभाग कुंभकर्णी झोपेत असल्यामुळे कल्याण टोलनाक्यांवाल्यानी आज पर्यंत मनमानी चालविली असून या टोलनाक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तुटपुंजी पगार देऊन आठ तास काम करून घेतले जातात व कर्मचाऱ्यांची आठ तास पिळवणूक करण्यात येत आहे

घुंगराळ्यासह राज्य महामार्गांवर प्रवासी निवारा सह स्वच्छालय अंडरग्राउंड नाल्या बांधण्यात यावे व वृक्षांची तात्काळ लागवड करून त्यांचे संगोपन करण्यात यावी अशी जनतेतुन बोलल्या जात असले तरी लाखो रुपयाची टोल वसुली होत असतानाही कहाळा कल्याण टोलनाक्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बेजबाबदारपणामुळे -घुंगराळा येथे प्रवासी निवारा बांधलाच नसल्यामुळे जनतेत संताप करण्यात येत असून शासनाने अशा बेजबाबदार काहाळा कल्याण टोलनाक्याकडे लक्ष देऊन प्रवासी निवारे बांधण्यात यावे असी मागणी जनतेतून मागणी होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here