Home विदर्भ भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी आशा प्रशांत नाकाडे यांची निवड जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे यांनी...

भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी आशा प्रशांत नाकाडे यांची निवड जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे यांनी केली घोषणा

77
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20211128-WA0045.jpg

भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी आशा प्रशांत नाकाडे यांची निवड

जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे यांनी केली घोषणा

गडचिरोली :(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेऊन पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या कुटुंबांतील सदस्यांचा भाजपाने नेहमीच सन्मान केला आहे. पक्ष संघटना वाढीसाठी म्हणून देसाईगंज तालुक्यातील विसोरा येथिल सुप्रसिद्ध असलेल्या प्रशांत नाकाडे यांच्या अर्धांगिनी आशा नाकाडे यांची भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्ष म्हणून भाजपा प्रदेशच्या मार्गदर्शनात निवड करण्यात आली आहे.
भाजप जिल्ह्यात वाढविण्यासाठी काम करणाऱ्या सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या शिफारशीनुसार आशा प्रशांत नाकाडे यांची निवड करण्यात आली आहे. सदर निवड भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे यांनी केली आहे. या निवडीचे श्रेय विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर ,खासदार अशोकजी नेते, आमदार डॉ.रामदासजी आंबटकर, , आमदार डॉ. देवरावजी होळी, आमदार कृष्णाजी गजबे यांना दिले आहे.
या निवडीबद्दल भाजपाचे जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, प्रशांतजी वाघरे, रविंद्रजी ओल्लालवार, प्रमोदजी पिपरे, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सभापती प्रा. रमेशजी बारसागडे, प्रदेश सदस्य किसान मोर्चा रमेशजी भुरसे, प्रदेश महामंत्री आदिवासीं मोर्चा प्रकाशजी गेडाम, महीला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा सौ योगिता ताई भांडेकर, ओबीसी नेते प्रणयभाऊ खुणे, अनील पोहनकर, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष सौ योगिता पिपरे, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, देसाईगंज नगराध्यक्ष शालूताई दंडवते, उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, आदींनी अभिनंदन केले आहे

Previous articleधामणगाव येथील दिव्यांग , वृद्ध , निराधार मित्र मंडळ संघटनेच्या नामफलकाचे अनावरण
Next articleकल्याण के टी टोलनाका लाखो रुपयाची टोल वसुली होत असतानाही कहाळा कल्याण टोलनाक्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बेजबाबदारपणामुळे -घुंगराळा येथे प्रवासी निवारा बांधलाच नसल्यामुळे जनतेत संताप —
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here