Home विदर्भ उद्या गडचिरोलीत २ डिसेंबरला शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आमदार डॉ देवरावजी होळी...

उद्या गडचिरोलीत २ डिसेंबरला शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आमदार डॉ देवरावजी होळी यांच्या नेतृत्वात शेतकरी मोर्चा

126
0

राजेंद्र पाटील राऊत

उद्या गडचिरोलीत २ डिसेंबरला शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

आमदार डॉ देवरावजी होळी यांच्या नेतृत्वात शेतकरी मोर्चा

गडचिरोली,( सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राज्यातील आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कृषी पंपाचे वीज कनेक्शन खंडित करण्याचे काम सुरू करून त्यांचा छळ चालविला आहे. त्यामुळे त्यांचे वीज कनेक्शन पूर्ववत सुरू व्हावे यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ आमदार डॉ देवरावजी होळी यांच्या नेतृत्वात गडचिरोली व धानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांचा २ डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवराव होळी यांनी दिली आहे.

चामोर्शी तालुक्यात २९ नोव्हेंबरच्या शेतकरी मोर्चाला शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद देत राज्य सरकारचा निषेध केला होता. गडचिरोली व धानोरा तालुक्यातील शेतकऱ्यानी २ डिसेंबरला दूपारी २ वा. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे.
राज्य सरकारने अजूनपर्यंत धानाला बोनस जाहीर केला नाही. अवाजवी व मनमानी पद्धतीने प्रचंड बिल आकारून शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे बिल वीज कनेक्शन कापण्याचे पाप हे सरकार करीत आहे. अवकाळी पावसामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या व शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असतानाही त्यांना कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. पात्र असूनही घरकूलासाठी लाभार्थ्यांची निवड केली नाही. यासह विविध मागण्याचा पूर्ततेसाठी आमदार डॉ देवरावजी होळी यांच्या नेतृत्वात गडचिरोली व धानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येत असून मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

Previous articleअवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान
Next articleमराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत राज्य सरकारने केली आश्वासनाची पूर्तता
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here