Home Breaking News ( प्रविण अहिरराव युवा मराठा  न्युज ब्युरो टीम )  मध्य प्रदेशातील श्योपुरमधील...

( प्रविण अहिरराव युवा मराठा  न्युज ब्युरो टीम )  मध्य प्रदेशातील श्योपुरमधील स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) शाखेकडून सोन्याच्या कर्जाच्या लॉकरमधून १५ किलो सोन्याच्या चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा

108
0

( प्रविण अहिरराव युवा मराठा  न्युज ब्युरो टीम )  मध्य प्रदेशातील श्योपुरमधील स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) शाखेकडून सोन्याच्या कर्जाच्या लॉकरमधून १५ किलो सोन्याच्या चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे.पोलिसांनि छोट्या – छोट्या पुराव्यांच्या आधारे प्रथम कॅशियरला अटक केली आणि नंतर त्याचा मित्र नवीन आणि त्याची महिला मित्र ज्योती याच्याकडे पोलीस पोहोचले.
त्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. कॅशियरचा साथीदार नवीन याने बनावट मार्गाने २६ वेळा चोरी केलेले सोने देऊन कर्जाच्या नावाखाली पैसे घेतल्याचा पोलिसांनी दावा केला आहे.
श्योपुरच्या एसबीआय शाखेच्या मॅनेजरने १० जून रोजी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती की, सोन्याच्या दागिन्यांच्या १०१ पाकिटे सोन्याच्या कर्जाच्या लॉकरमधून गायब आहेत. बँकेत चोरीच्या तक्रारीबद्दल पोलिसांनी त्वरित कारवाई केली आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here