Home कोल्हापूर हेरलेचा मोफत आरोग्य सेवेचा पॅटर्न जिल्ह्यात आदर्श असेल : सभापती डॉ. प्रदीप...

हेरलेचा मोफत आरोग्य सेवेचा पॅटर्न जिल्ह्यात आदर्श असेल : सभापती डॉ. प्रदीप पाटील

224
0

कोल्हापूर प्रतिनिधी: हेरले ता. हातकणंगले गावात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व कोरोना आटोक्यात आणण्यासाठी उपकेंद्राच्या माध्यमातून केलेला मोफत आरोग्य सेवेचा हेरले पॅटर्न कोल्हापूर जिल्ह्यात आदर्श असेल असे मत हातकणंगले पंचायत समिती सभापती डॉ. प्रदीप पाटील यांनी मत व्यक्त केले.

हेरले येथील मेडिकल असोसिएशन, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व कोरोना आटोक्यात आणण्यासाठी मोफत उपचार केंद्र सुरू केले आहे. या केंद्रास भेटी प्रसंगी ते बोलत होते.यावेळी हेरले मेडिकल असोसिएशनचे प्रतिनिधी डॉ.राजू पाटील यांनी होत असलेले उपचार व तपासणीची सविस्तर माहिती दिली.
हेरले गावातील मोफत उपचार आरोग्य सेवेचा आदर्श तालुक्यातील इतर गावांनी घेऊन असा आरोग्य सेवा उपक्रम सर्वत्र राबविण्यात यावा असे मत गटविकास अधिकारी डॉ.शबाना मोकाशी यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी पंचायत समितीच्या सदस्या महेरणीगा जमादार , पोलीस पाटील नयन पाटील , मुनिर जमादार, प्रा. राजगोंडा पाटील, माजी उपसरपंच संदिप चौगुले, उपसरपंच सतीश काशीद , माजी उपसरपंच राहुल शेटे,फरीद नाईकवडी, ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण , गुरुनाथ नाईक ,रोहित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here