Home माझं गाव माझं गा-हाणं सटाणा शहरात अवतरला कोरोना रुग्णासाठी देवदूत योध्दा “पठाण सर”       

सटाणा शहरात अवतरला कोरोना रुग्णासाठी देवदूत योध्दा “पठाण सर”       

204
0

राजेंद्र पाटील राऊत

सटाणा शहरात अवतरला कोरोना रुग्णासाठी देवदूत योध्दा “पठाण सर”                              सटाणा ,(शशिकांत पवार तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
संपूर्ण जगाला हैराण करून सोडलेल्या कोरोना आजारबाबतच्या बातम्या आपण
रोज ऐकतो व वाचतो आपल्या नातेवाईकला कोरोंना झाला म्हणून या रूग्णाला
नातेवाइक दवाखान्यात घेऊन जातात खर पण तो रुग्ण बरा झाला तरी त्याचे
नातेवाईक त्याला घरी घेऊन येण्यास ऊत्साही दिसत नाहीत, तर काही नातेवाईक
मंडळीने या रुग्णाकडे पाठ फिरवली आहे. जणू एकप्रकारे या आजाराने माणसातील
माणुसकीच नष्ट केली असुन माणसाला निर्दयी बनवले आहे. अशी या आजारा
बाबत भयानक परिस्थिति असतांनाही सटाणा येथील शफी बशीर खान पठाण हे या
आजाराला न घाबरता या रुग्णांसाठी देवदूता प्रमाणे झटत आहेत.
श्री पठाण यांनी आज पर्यन्त ७० ते ८० लोकांना या आजारा बाबत
सर्वोत्परी मदत केली आहे. ज्या रुग्नापासून त्याचे स्व:ताचे नातेवाईक देखील दूर
राहणे पसंत करतात त्या रूग्णाला पठाण आपल्या स्व:ताच्या गाडीवर बसवून रक्त,
लघवी व इतर तपासणी साठी घेऊन जातात. एक प्रकारे ते असे करून रुग्णाच्या
नातेवाईकांना लाजवतातच. पठाण यांच्या या कृती मुळे रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये
या आजराबाबत असलेली भिती आपोआप कमी होते, या आजारा बाबत काय
खबरदारी घेतली पाहिजे हे देखील समजावून सांगतात. संपूर्ण मालेगाव व सटाणा
तालुका भरातील अनेक कोरोंना रुग्णांना नवजीवन देणार्‍या डॉ . शिफा यांच्या कडे
पठाण या रुग्णांना उपचारासाठी घेऊन जातात व नाममात्र शुल्कात उपचार करून
घेतात. जेथे मोठ्या दवाखान्यात लाखो रुपये खर्चूनही अनेक रूग्णांच्या
नातेवाईकांच्या पदरी निराशा पडते तेथे डॉ. शिफा व पठाण यांच्या सहकार्याने रुग्ण
अगदी ठणठणीत होऊन अनेक रुग्णांना नवजीवन मिळाले आहे. त्याच संपूर्ण
महाराष्ट्र प्रसिद्धा जोशांदा काढा व काही आयुवेर्दिक औषधे देखील या रुग्णांला
स्वस्तात उपलब्ध करून देतात व ज्यांची आर्थिक परिस्थिति गरिबीची आहे त्यांना
पठाण स्वतच्या खिशातून पैसे टाकून हे औषधे घेऊन देतात .
त्या मुळे जे रुग्ण बरे झाले त्यांचे नातेवाईक व रुग्ण पठाण यांचे आभार मानतात व देवदूत समजतात व कौतुक करतात व अशा प्रकारे पठाण यांची मौखिक महती अनेक लोकांपर्यंत आपोआप पोहचली असून कोणालाही त्रास झाल्यास लोक पठाण यांना संपर्क साधतात व पठाण मदतीसाठी हजर होतात. हे कार्य करता करता पठाण देखील स्वता पॉजिटिव झाले होते. पण तत्काल उपचार घेतल्याने ते बरे झाल्याने पुन्हा त्यानही आपले कार्य सुरू ठेवले आहे. त्यांच्या या कार्यामुळे समाज विघातक व्यक्ति त्यांची खिल्ली उडवत वेड्यात काढतात पण ” वेडेच इतिहास घडवितात ” या उक्ती प्रमाणे ते जातीभेदिना छेद देत फक्त “मानवता हाच एक धर्म ” मानून ते आपले कार्य निस्वार्थी पणे करत आहेत. या कोरोंना काळात ” work from home ” करताना एक शासकीय कर्मचारी म्हणून शासनाला मदत करीत आहेत असेच म्हणावे लागेल.
ज्या प्रमाणे पठाण सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत त्या प्रमाणे आपल्या कार्यालीन कामात देखील कर्तव्यदक्ष व तत्पर आहेत. त्यांच्या या कार्य तत्परतेमुळे माननीय अप्पर आयुक्त आदिवासी विकास नाशिक व प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास कळवण प्रकल्प यांनी श्री. पठाण व त्यांचे एक सहकारी यांची आदिवासी बांधवांच्या वन हक्क जमिनीच्या दाव्याच्या कामांसाठी कळवण, सटाणा , सुरगाणा, देवळा या चार तालुक्यातील या मोहिमेसाठी त्यांची प्रतींनियुक्ती वर कळवण उप विभागासाठी नेणणूक केली. वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी व दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत वे काम मुदतीच्या आत करत २१,५११ दावे प्रकरणं निकाली काढत सदरील कामे पूर्ण केल्याने या उत्कृष्ट कामगिरी बद्दल मा. पी. एस . मीना . प्रधान सचिव आदिवासी विकास व अप्पर आयुक्त नाशिक यांनी पठाण यांची प्रशंसा केली. तर कळवण उप विभागिय अधिकारी मा. दत्ता देवगावकर सो. व मिसाळ मॅडम यांनी प्रशस्ती पत्र प्रदान करून सन्मान केला व श्री. पठाण यांना या उत्त्कृष्ठ कामगिरीबद्दल दोन वाढीव वेतन वाढ देण्या बाबत मा. प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास कळवण यांना शिफारस केली होती. एवढे उत्त्कृष्ठ कार्य करून देखील या कार्यालयाने अध्याप देखील वाढीव वेतनवाढ दिली नाही हे पठाण यांचे दुर्देव महाणावे लागेल .
अशा या शेकडो लोकांना कोरोणा सारख्या आजारापासून वाचवणार्‍य कोरोंना योद्धास देवदूतच म्हणावे लागेल ,या देवदूत योध्यास युवा मराठा न्युजचा मानाचा सलाम !

Previous articleविजेचा शॉक लागून वाटेगावातील पैलवानाचा मृत्यू
Next articleहेरलेचा मोफत आरोग्य सेवेचा पॅटर्न जिल्ह्यात आदर्श असेल : सभापती डॉ. प्रदीप पाटील
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here