Home कोल्हापूर वडगांवचे व्यापारी हिरालाल राठोड यांच्या परिवाराच्या वतीने कोरोना योद्यांना सॅनिटायझर, मास्क, पाणी...

वडगांवचे व्यापारी हिरालाल राठोड यांच्या परिवाराच्या वतीने कोरोना योद्यांना सॅनिटायझर, मास्क, पाणी वाटप वडगाव पोलीस ठाण्यात तून शुभारंभ

618
0

 

पेठवडगांव (प्रतिनिधी) कोरोना महामारीत जीवाची बाजी करून अहोरात्र कर्तव्य पार करणाऱ्या वडगांव पोलीस दलाला येथील प्रतिष्ठित व्यापारी हिरालाल राठोड सोशल फोऊंडेशन यांच्या वतीने सॅनिटायझर, मास्क व पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या वाटप करण्यात आल्या.दरम्यान प्रतिष्ठीत व्यापारी कुमार राठोड यांच्या हस्ते वडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या कडे सुपूर्त करण्यात आले.उपक्रमा प्रसंगी पत्रकार संजयबाबा दबडे उपस्थित होते.
पेठ वडगांव व परिसरावर आलेल्या आस्मानी सुलतानी संकटात व्यापारी हिरालाल राठोड आणि त्यांचे सुपुत्र कुमार व विकास राठोड यांचा सहभाग असतो.वडगांववासीयांच्या वर आलेल्या पाणीबाणी संकटात लाखो रुपयांची मदत देऊन थेट नळपाणी पुरवठा योजनेला साथ दिली होती.शहरातील विविध भागात पिण्याच्या पाण्यासाठी पाणपोईची सोय करण्यात राठोड कुटूंबियांचा मोलाचा वाटा आहे.रंजल्या गांजल्याना आर्थिक ,मानसिक मदत करून पुण्याचे काम करीत आहेत.कोरोनाच्या महामारीत भुकेल्याना अन्न धान्य देण्याचा उपक्रम हाती घेतला असल्याचे कुमार राठोड यांनी सांगितले.

Previous articleहेरलेचा मोफत आरोग्य सेवेचा पॅटर्न जिल्ह्यात आदर्श असेल : सभापती डॉ. प्रदीप पाटील
Next articleवडगांंव शहर मनसे च्या वतीने दररोज २५० गरजू व्यक्तींना अन्नदान
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here