Home नांदेड कुस्तीला अधिकाधीक वैभव मिळण्यासाठी प्रयत्न करणार ▪️आमदार शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते कुस्ती...

कुस्तीला अधिकाधीक वैभव मिळण्यासाठी प्रयत्न करणार ▪️आमदार शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते कुस्ती स्पर्धेचे थाटात उद्घाटन

39
0

आशाताई बच्छाव

IMG_20240112_180637.jpg

▪️कुस्तीला अधिकाधीक वैभव मिळण्यासाठी प्रयत्न करणार
▪️आमदार शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते कुस्ती स्पर्धेचे थाटात उद्घाटन

लोहा प्रतिनिधी
अंबादास पाटिल पवार

दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र खंडोबारायाच्या यात्रेत आयोजित कुस्तीच्या भव्य स्पर्धेचे उद्घाटन काल शुक्रवारी लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, गटविकास अधिकारी आडेराघो ,माजी जिल्हा परिषद सदस्य तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चंद्रसेन पाटील, कंधार नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष शाहूराज नळगे ,खरेदी विक्री संघाचे उपसभापती शाम अण्णा पवार, बाजार समितीचे उपसभापती अण्णाराव पवार, सरपंच प्रतिनिधी पुंडलिक पाटील बोरगावकर, शेकाप जिल्हाध्यक्ष बालाजी ईसातकर, बाजार समितीचे संचालक केशव तिडके, माळाकोळी चे सरपंच जनार्दन तिडके, शेकाप तालुकाअध्यक्ष नागेश हिलाल, माळेगावचे सरपंच प्रतिनिधी हनुमंत धुळगंडे सह पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे
अधिकारी, विस्तार अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते ,यावेळी बोलताना आमदार शिंदे म्हणाले की माझ्या मतदारसंघातील नव- तरुण खेळाडूंना मैदानी खेळाची ओढ लागावी व कुस्ती ,कबड्डी या मैदानी खेळातून मतदारसंघातील नवतरुण खेळाडू हे कुस्ती, कबड्डी
या मैदानी खेळाच्या माध्यमातून खेळाडूंनी आपले स्वतःचे व मतदारसंघाचे नाव राज्य, देश पातळीवर गाजवावे यासाठी खेळाडूंना यापुढे माझ्या माध्यमातून प्रोत्साहन देऊन मतदारसंघात उत्कृष्ट कुस्तीपटू घडण्यासाठी माझा प्रयत्न राहणार असून या कुस्ती व कबड्डी या मैदानी खेळांना या यापुढे अधिकाधिक वैभव मिळण्यासाठी मी या भागाचा आमदार म्हणून प्रयत्न करणार असल्याचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले, यावेळी आमदार शिंदे यांच्या हस्ते प्रथम मानाची कुस्ती लावण्यात आली, यावेळी अनेक भागातील कुस्तीपटू , प्रेक्षक, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleसतीश घाटगेंनी दूर केला बापकळ गावातला अंधार चार दिवसात  गावात आले ट्रान्सफॉर्मर
Next articleशनिशिंगणापूर येथे भारत संकल्प यात्रेचे जल्लोषात स्वागत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here