Home पश्चिम महाराष्ट्र वाई येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम

वाई येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम

255
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 वाई येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम 🛑
✍️ सातारा 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

सातारा :⭕वाई शहरासाठी सुधारित पाणीपुरवठा योजनेसाठी प्रस्ताव सादर करावा, त्यासाठी ३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल, असे प्रतिपादन यावेळी केले. वाई शहराचा विस्तार लक्षात घेता आवश्यक सुविधांची निर्मिती करण्यासाठी शासनाकडून सहकार्य करण्यात येईल.

वाई, महाबळेश्वर, खंडाळा, लोणंद, पाचगणीतील विविध सुविधांसाठी १० कोटी रुपये देण्यात येतील. वाई शहरातील भूमिगत गटार योजनेबाबत लवकरच बैठक घेण्यात येईल. कृष्णा घाट विकास आणि नदी सुधार योजनेचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा. श्री. नितीनजी गडकरी यांच्या समवेत होणाऱ्या बैठकीत सुरुर-पोलादपूर राज्य महामार्गाचा राष्ट्रीय महामार्ग म्हणून समावेश करण्याबाबत विनंती करण्यात येईल.

शहरांचा विकास करताना ती स्वछ आणि नीटनेटकी असायला हवीत. शहरातील सांडपाणी व्यवस्थापन चांगल्यारितीनं होणं गरजेचं आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी आग्रही भूमिका घ्यावी. नव्यानं उभारण्यात येणाऱ्या शाळेच्या इमारतीमधून दर्जेदार शिक्षण देण्यात यावं. पुलाचे काम देखणे आणि दर्जेदार व्हावे.

भविष्यातील वाहतुकीची गरज लक्षात घेऊन डिसेंबरपर्यंत चार पदरी पुलाचा प्रस्ताव सादर करावा. येत्या अंदाजपत्रकात त्यासाठी मान्यता देण्यात येईल, असं कार्यक्रमाप्रसंगी स्पष्ट केलं.⭕

Previous articleअकोला जिल्ह्यात क्रीडा नैपुण्य चाचणीस प्रारंभ
Next articleपुणे करणार पादचारी दिन साजरा करणारं देशातील पहिलं शहर 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here