Home पुणे पुणे करणार पादचारी दिन साजरा करणारं देशातील पहिलं शहर 🛑

पुणे करणार पादचारी दिन साजरा करणारं देशातील पहिलं शहर 🛑

392

राजेंद्र पाटील राऊत

🛑 पुणे करणार पादचारी दिन साजरा करणारं देशातील पहिलं शहर 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕सार्वजनिक वाहतुकीत पादचारी हाही अत्यंत महत्त्वाचा घटक असून पादचारी नागरिकांना प्रोत्साहन मिळावे, त्याचे महत्त्व समजावे, या उद्देशाने आपली पुणे महापालिका येत्या ११ डिसेंबर रोजी पादचारी दिन साजरा करणार असून पुणे शहर पादचारी दिन साजरा करणारे देशातील पहिले शहर असणार आहे.

विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला आहे. पादचारी दिन कसा साजरा करण्यात यावा, दरवर्षी साजरा करण्यासाठी काय काय करावं? या संदर्भात या बैठकीत चर्चा झाली.

यावेळी स्वयंसेवी संस्थांच्या वतीनं श्री. सुजित पटवर्धन, श्री. अभ्यंकर, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांच्यासह पथ विभाग, मेट्रो, वाहतूक पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थित घटकांकडून पादचारी दिन कसा साजरा करण्यात यावा, याबद्दल मते जाणून घेतली.

शिवाय शहरातील पादचारी मार्गांची दुरुस्ती, पादचारी भुयारी मार्गांचे नूतनीकरण, सीसीटीव्ही कॅमेरा आणि लाईट्स अशा विविध विषयांवरही यावेळी चर्चा झाली. केवळ एकदिवसीय इन्व्हेंट न करता, यात भरीव काम करण्याचा आपला मानस आहे.⭕

Previous articleवाई येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम
Next articleविविध मागण्यांसाठी शिवसैनिक रस्त्यावर! शिवसैनिकांकडून एकप्रकारे घरचा आहेरच….?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.