• Home
  • २जून रोजी संपुर्ण महाराष्ट्रातून एकाच दिवशी पंतप्रधान मोदींना देणार रूग्ण हक्क परिषद निवेदन

२जून रोजी संपुर्ण महाराष्ट्रातून एकाच दिवशी पंतप्रधान मोदींना देणार रूग्ण हक्क परिषद निवेदन

*विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे*
#२जून रोजी संपुर्ण महाराष्ट्रातून एकाच दिवशी पंतप्रधान मोदींना देणार रूग्ण हक्क परिषद निवेदन #पंतप्रधानांनी_कोरोनाचे_औषधोपचार_मोफत_करावेत
#या मागणीसाठी तहसीलदार आणि जिल्हाधिकार्या मार्फत निवेदन देणार
#संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष उमेश चव्हाण यांची माहिती

#पुणे- एक लाखाहून अधिक कोरोनाचे रूग्ण देशात वाढले असताना सरकारी रुग्णालये अत्यंत वाईट अवस्थेत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. खाजगी आणि धर्मादाय रुग्णालये बेड शिल्लक नाही, आधी एक लाख रुपये डिपॉझिट भरा, आणि रूग्ण बरा झाल्यास अथवा मृत्यूनंतर लाखोंच्या रकमेचे बिल रुग्णाच्या हातावर ठेवत आहेत. अश्या परिस्थितीत हाताला काम – मजुरी नसताना इतके पैसे गोळा करताना लोकांच्या नाकी नऊ येत आहेत.
कोरोनाची जागतिक महामारी असताना लोकांच्या जीवाची काळजी सरकारनेच घ्यायला हवी. लोकांना जीवनावश्यक वस्तू म्हणून फक्त धान्य दिल्याने प्रश्न सुटत नाहीत. आता खरी गरज आहे ती कोरोनाचे उपचार सर्वच हॉस्पिटलमध्ये मोफत करण्याची आणि यासाठी रूग्ण हक्क परिषद पाच मागण्याचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २ जून २०२० रोजी एकाच दिवशी देणार आहे.
या अनोख्या आंदोलना बाबत बोलताना रूग्ण हक्क परिषदेचे संस्थापक तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले की, कोरोनाच्या उपचारार्थ ज्यांनी लाखो रुपयांची बिले भरली ती परत मिळाली पाहिजेत. यापुढे कोरोनाचे उपचार सर्वच हॉस्पिटलमध्ये मोफत झालेच पाहिजेत. कोरोनाची तपासणीही मोफत झालीच पाहिजे. लोकांच्या दररोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला दहा हजार रुपये तातडीने खात्यावर दिले पाहिजेत या प्रमुख मागण्यासाठी मंगळवारी २ जून २०२० रोजी एकाच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देऊ. मागण्या अमान्य केल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
पंतप्रधान यांना संबधित तालुक्याचे तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्या मार्फत रूग्ण हक्क परिषदेचे शिष्टमंडळ निवेदन सादर करणार आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव फक्त पाच कार्यकर्ते पदाधिकारी फिजिकल डिस्टन्स ठेवून शिष्टमंडळात सहभागी होतील. मात्र एका तालुक्यातून सुमारे आठ ते दहा शिष्टमंडळे तहसीलदार यांच्या मार्फत पंतप्रधानांना निवेदन देतील तर शहर व जिल्ह्याची कमिटी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना अनेक शिष्टमंडळे तयार करून मोफत उपचाराची मागणी करतील.

anews Banner

Leave A Comment