Home बीड बीडमध्ये मतदार जागृतीसाठी सायक्लोथॉनचे आयोजन

बीडमध्ये मतदार जागृतीसाठी सायक्लोथॉनचे आयोजन

23
0

Yuva maratha news

1000316774.jpg

बीडमध्ये मतदार जागृतीसाठी सायक्लोथॉनचे आयोजन

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड दि: २६  ‘सायकल चालवा आरोग्यासाठी मतदान करा लोकशाहीसाठी’ या उक्तीप्रमाणे रविवार दिनांक २८ एप्रिल रोजी बीड जिल्ह्यात मतदार जागृतीसाठी सायकलिंग (सायक्लोथॉन) हा विषय उपक्रम मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी राबविला जाणार आहे. सोमवार दि: १३ मे २०२४ रोजी ३९ बीड लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जात आहेत. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ – मुंडे यांच्या मार्गदर्शनात सायकलिंग (सायक्लोथॉन) उपक्रम राबवणार आहोत. रविवार दिनांक २८ एप्रिल सकाळी सात वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी या ठिकाणाहून बीड शहरातील मुख्य रस्त्यावरून किमान दहा किलोमीटर सायकल चालवून मतदारांना मतदान करण्यासाठी जागरुकता निर्माण केली जाईल. या सायकल फेरीमध्ये बीडमधील मतदार नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊ शकतात. पांढरा टी-शर्ट व काळी पॅन्ट घालून या मॅरेथॉनचा हिस्सा होऊन ‘मी मतदान करणार असा संदेश मतदारांनी द्यावा’असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी यावेळी केले. मुद्रित तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांनी माध्यमकर्मींनीही या सायक्लोथॉनमध्ये सहभाग नोंदवून मतदारांना मतदानासाठी जागरूक करावे, अशी अपेक्षा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी व्यक्त केली आहे. या सायकल रॅलीमध्ये बीड जिल्ह्यातील लायन्स क्लब, रोटरी क्लब, पोलीस, महिला, जिल्हा परिषद तथा महसूल संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी होतील.

Previous article.ह.भ.प. गोविंदराव महाराज वडजे तांदळिकर यांचे अल्पशा आजाराने निधन.
Next articleतुमसर पोस्ट ऑफिसमध्ये ग्राहकांना असभ्य वागणूक ग्राहकाला मारहाण करण्याचा प्रयत्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here