Home नाशिक पंचशील नगर ओझर येथे अन्याय अत्याचार निर्मुलन समिती तर्फे नेत्ररोग तपासनी व...

पंचशील नगर ओझर येथे अन्याय अत्याचार निर्मुलन समिती तर्फे नेत्ररोग तपासनी व उपचार शिबीर संपन्न…!               

147

आशाताई बच्छाव

Screenshot_20231014-175804_WhatsApp.jpg

“पंचशील नगर ओझर येथे अन्याय अत्याचार निर्मुलन समिती तर्फे नेत्ररोग तपासनी व उपचार शिबीर संपन्न…!                                                  नाशिक,(प्रतिनिधी अँड विनया नागरे) – : ओझर पंचशील नगर बुध्दविहार या ठीकाणी धर्मांतर घोषणेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून ओझर परिसरातील सर्वसामान्य गरीब गरजु नागरीकां करीता अन्याय अत्याचार निर्मुलन समिती व नाशिक येथील दुर्गा आय केअर हाऊस्पिटल च्या संयुक्त विद्यमाने समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा.रविंद्रदादा जाधव यांचे मार्गदर्शनाखाली नेत्ररोग तपासणी व उपचार शिबीर नुकतेच संपन्न झाले. या शिबीरात डोळ्यांचा त्रास, मोतीबिंदू, काचबिंदू, तिरळेपणा, चक्कर येणे, मानेच्या शिरा दुखणे, डोळ्यात पाणि येणे, जवळचे व लांबचे न दिसणे ईत्यादी तपासण्या करण्यात आल्या. या शिबीरात नेत्ररोग तज्ञ डाॅ.सुनिल पगारे यांनी नेत्र तपासणी केली तर या शिबीरात हाऊस्पिटलचे परिचारिका सौ.चमक भालेराव, हीना सिद्दीकी, विद्या पगारे, रुपाली शेळके, अर्चना मॅडम व आरोग्य सेवक राजेंद्र गांगुर्डे आदीं कर्मचारीवर्ग उपस्थित होता. या शिबीराचे आयोजन अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे तालुका संघटक गोपीनाथ वाघमारे, युवक जिल्हा उपाध्यक्ष अजय शेजुळ, पंचशील नगर शाखाध्यक्ष प्रदीप केदारे, उपाध्यक्ष विशाल वाघमारे, सागर वाघमारे आदींनी परिश्रम घेतले. सुमारे तिनशे नेत्ररुग्णांची तपासणी करण्यात आली तर अल्पदरात नंबरचे चष्मे देण्यात आले. मोतिबिंदु असलेल्या रुग्णाची शस्त्रक्रिया नाशिक येथे मोफत करण्यात येणार असल्याचे नमुद करण्यात आले. हाऊस्पिटल स्टाॅफ व कर्मचारीवर्गाचे गुलाबपुष्प देवुन अ.आ.नि.स.च्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले तर या शिबीरास पंचशील नगर येथील नागरीकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.

Previous articleजिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत देगलूर महाविद्यालयाचे यश…
Next articleनाशिकला भाई उपाले यांचे व्याख्यान संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.