Home नाशिक नाशिकला भाई उपाले यांचे व्याख्यान संपन्न

नाशिकला भाई उपाले यांचे व्याख्यान संपन्न

34
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231014-180354_WhatsApp.jpg

नाशिक,( प्रतिनिधी अँड विनया नागरे)-‘नाशिक शिक्षण प्रसारक’ मंडळाने संस्थेच्या सर्व बालमंदिरातील विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी पालक सभेत ” अन्न हे पूर्ण ब्रह्म ” या विषया वरती विद्या भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे शिशू वाटिका प्रमुख आदरणीय भाई उपाले यांचे मार्गदर्शनपर व्याखाने प्रत्येक बालमंदिरात गेली आठवडाभर आयोजित केली होती. खरे तर सध्याचे दैनंदिन जीवनात हा अगदी महत्वाचा विषय आहे. असे गरजेचे विषय निवडुन फक्त विद्यार्थ्यांनाच नाही तर पालक, शिक्षक प्रत्येक घटकास संस्था सजग करून ज्ञान देण्याचा प्रयत्न करत असते. एकाच वेळी एकाच प्रकारचे सर्व संकुलांमध्ये कार्यक्रम घेणे हे नक्कीच स्तुत्य आहे ……..
संस्थेच्या नवीन मराठी शाळा व बालमंदिर येथे झालेल्या या व्याख्यानात मा.भाई उपालेजी यांनी अधोरेखित केलेले काही मुद्दे …. यातील प्रत्येक शब्द महत्वाचा आहे ……..
आईने घरातले ताजे, प्रेमाने प्रसन्न मनस्थितीत तयार केलेले, तुम्ही राहता तेथल्या मातीत तसेच त्या त्या हंगामात पिकलेले, ऋतूनुसार संस्कार प्रक्रिया केलेले , सहा चवींनी युक्त असे अन्न मुलांना मिळाले पाहिजे.* “उदरभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म”या उक्तीनुसार कुठलेही अती प्रमाण म्हणजे आजाराला निमंत्रण गरजेपुरतेच हवे आकंठ नको .सत्वगुणी मुले पाहिजे असतील तर सात्विक अन्नच द्यावे लागेल . भूक लागेल तेव्हा मुलांनी मागितले पाहिजे आणि आईनी त्यांना दिले पाहिजे . बाहेरचे नजर लागलेले वा विपरीत मनस्थितीत तयार केलेले दूषित अन्न मुलांना नको . भांडीही ऑलीमिनिअम प्लास्टिक नको .तवा लोखंडी ,तांबे पितळ,माती अशा भांड्यांचा वापर असावा. आनंदाने समरस होऊन जेवले पाहिजे .. केलेल्या पदार्थच कौतुक आपण केले तर मुले करतील . मुलांच्या सर्वांगीण विकासात शरीर महत्वाचे … कौशल्य सहनशीलता लवचिकता आरोग्य …. प्रत्यक्ष परमेश्वराची पण इच्छा असते तह हयात आईचे हातचे जेवन मिळावे (यावर एक गोष्टही सांगितली ).

मुलांना प्रसंगी वा शाबास म्हणणे, धीर देणे , कुठे लगेच होकार द्यावा कुठे pause घ्यावा कुठे नकार द्यावा हे सर्व जाणले पाहिजे .
मुलांना नैराश्य टाळावयाचे असेल तर उत्तम झोप 9/10 तास गरजेची आहे. हे सर्व झाले तर शारिरीक मानसिक आरोग्य चांगले राहील. हे सर्व आपल्या हातात आहे असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here