• Home
  • मान्सून आला रे आला ! ४८ तास आधी केरळच्या वेशीवर

मान्सून आला रे आला ! ४८ तास आधी केरळच्या वेशीवर

🛑 मान्सून आला रे आला ! ४८ तास आधी केरळच्या वेशीवर 🛑
( महाराष्ट्र प्रतिनिधी विजय पवार युवा मराठा न्युज )

कोची ⭕: शेतकऱ्यांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांची मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे. मान्सून वेळेआधीच 2 दिवस लवकर केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती स्कायमेटनं दिली आहे. शनिवारी स्कायमेटनं ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. रविवारी सकाळी दक्षिण भारतासह अरबी समुद्राच्या किनारपट्टीलगतच्या भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे.

तामिळनाडूसह पश्चिम कर्नाटकात ढगाळ वातावरण असल्याची माहिती मिळाली आहे. कर्नाटक आणि गोव्यात आज मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर मुंबईसह कोकणात सातत्यानं हवामान बदलत आहे.
यंदा मान्सून वेळेतआधी दाखल झाल्याचं सांगितलं जात आहे.
केरळच्या वेशीवर असलेला मान्सून महाराष्ट्रात कधी येणार याची प्रतीक्षा सगळ्यांना आहे. शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू होणार आहे. यंदा मान्सून सरासरीच्या 100 टक्के म्हणजे सामान्य असेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याच्या वृत्ताला हवामान विभागाकडून अद्याप दुजोरा देण्यात आला नाही. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हवामानात वेगानं बदल होत असल्याचं म्हटलं आहे.

 

 

https://aaplekayde.blogspot.com

anews Banner

Leave A Comment