• Home
  • सत्शील शेरकर व अक्षय बोऱ्हाडे वादात आमदार बेनकें यांची मध्यस्थी ने वाद मिटला

सत्शील शेरकर व अक्षय बोऱ्हाडे वादात आमदार बेनकें यांची मध्यस्थी ने वाद मिटला

🛑 सत्शील शेरकर व अक्षय बोऱ्हाडे वादात आमदार बेनकें यांची मध्यस्थी ने वाद मिटला 🛑
( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

⭕ राज्यात गेल्या तीन दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेल्या जुन्नर तालुक्यातील सत्यशील शेरकर विरुद्ध अक्षय बोऱ्हाडे यांच्या वादाने आज वेगळे वळण घेतले. जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्या शिष्टाईने शेरकर आणि बोराडे यांच्यातील वाद मिटला आहे. आमदार बेनके यांच्यासोबत त्या दोघांचे एकत्रित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

तीन दिवसांपूर्वी शिवस्फूर्ती फौंडेशनचे संस्थापक अक्षय बोऱ्हाडे यांनी एक व्हिडीओ व्हायरल करत’विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी बंगल्यावर बोलावून आपल्याला मारहाण केल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली होती.
अक्षय हे मानसिकदृष्ट्या खचलेले आणि वयोवृद्ध लोकांचा आश्रम चालवत असल्याने राज्यभर त्यांची वेगळी ओळख आहे.
त्यामुळे त्यांना या प्रकरणात राज्यातून मोठा पाठींबा मिळाला. शेकडो लोक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आणि छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी अक्षयला पाठिंबा देत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगितले. सोशल मीडियावर अक्षयला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला होता. त्याचदरम्यान खासदार अमोल कोल्हे यांनी,”या प्रकरणातील दोन्ही बाजू तपासून बघाव्यात.”असे विधान केल्याने त्यांनाही नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते. याबाबत शेरकर यांच्यावर जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

आज दुपारी आमदार अतुल बेनके यांनी बोऱ्हाडे आणि शेरकर प्रकरणात मध्यस्थी करत त्यांच्यातील वाद मिटवला. तसे एकत्रित फोटो व्हायरल झाले. याबाबत आमदार बेनके यांच्याशी संपर्क साधला.त्यांच्याशी बोलणे झाले नाही मात्र या वृत्ताला बेनके यांचे स्वीय सहायक प्रसाद पानसरे यांनी दुजोरा दिला आहे. सत्यशील शेरकर आणि अक्षय बोऱ्हाडे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र दोघांचेही फोन बंद होते.

 

 

https://aaplekayde.blogspot.com

anews Banner

Leave A Comment