• Home
  • ठेंगोडयात कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्याने गाव हादरले…!!*

ठेंगोडयात कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्याने गाव हादरले…!!*

*ठेंगोडयात कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्याने गाव हादरले…!!*
सटाणा,(जयवंत धांडे प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-नाशिकच्या सटाणा तालुक्यातील ठेंगोडा येथे दोन कोरोनाचे पाँझिटिव्ह रुग्ण सापडल्याने संपूर्ण गाव हादरले आहे.
ठेंगोडयात सापडलेले दोघेही कोरोना बाधित हे पती पत्नी असून व्यवसायाने दोघेही डाँक्टर आहेत.आठ दिवसापुर्वी ते मुंबई ठाणे येथून सासू सासरे यांच्यासह ठेंगोडा येथे आले होते,त्यांचे वास्तव्य गावाशेजारील मळ्यात असल्याने त्यांचा गावाशी फारसा काही संबंध आला नाही.
तरीही गावातील माणूस त्यांचेकडे कामाला होता.डाँक्टरांची तब्बेत बिघडल्याने त्रास जाणवू लागला त्यामुळे त्यांनी चार दिवस घरीच उपचार घेतले.मात्र कुठलाही फरक पडला नाही त्याशिवाय तसाच त्रास डाँक्टरांच्या पत्नीलाही जाणवू लागल्याने त्यामुळे शंका निर्माण झाली.व त्यामुळे त्यांना लगेचच नाशिक येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.तेथे ते पाँझिटिव्ह आल्याने ठेंगोडा गावात खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या कुटूंबातील एकूण आठ लोकांना आता क्वारटांईन करण्यात आले आहे.तर नागरिकांनी सुरक्षित राहून स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनासह ठेंगोडा ग्रामपंचायतीने केले आहे.

anews Banner

Leave A Comment