• Home
  • *इचलकरंजीत एका युवतीचा विनयभंग करून धमकी दिल्याबद्दल एकास अटक*

*इचलकरंजीत एका युवतीचा विनयभंग करून धमकी दिल्याबद्दल एकास अटक*

*इचलकरंजीत एका युवतीचा विनयभंग करून धमकी दिल्याबद्दल एकास अटक*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी शहरात एका युवतीचा विनयभंग करून धमकी दिल्या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी संजय गोविंद बडे रा.साई मंदीर मागे स्वामीमळा इचलकरंजी यास अटक केली आहे.
याबाबत ची फिर्याद पिडीत युवतीने दिली आहे . सदर युवती काल सायंकाळी यशोलक्ष्मी मंगलकार्यालय येथून जात असताना आरोपी संजय बडे याने तिला थांबवून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिचा विनयभंग केला यावेळी अचानक झालेल्या प्रकारामुळे युवतीने आरडाओरडा केला आसता सदर युवतीस कानशिलात मारून सदरचा प्रकार कुणाला सांगितलास तर तुझ्या घरच्या लोकांना सोडणार नाही अशी धमकीही त्याने युवतीस दिली.
यानंतर घडलेल्या प्रकाराने घाबरलेल्या अवस्थेत पिडीत युवतीने संजय बडे याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी अधिक तपास पी.एस.आय. मगर हे करत आहेत.

anews Banner

Leave A Comment