*वडगांव कोविड सेंटरला पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट*
*वडगांव कोविडसेंटर सर्वसामान्यांचा आधार*
*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज )*
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व गृहराज्यमंत्री मा. श्री सतेज उर्फ बंटी पाटील साहेब व हातकणंगले तालुक्याचे आमदार राजू बाबा आवळे साहेब यांची पेठ वडगांव येथील लोकसहभागातुन सुरु केलेल्या कोविड सेंटरला (धन्वंतरी रूग्णालयात) भेट दिली व
देऊन सोबत येताना कोल्हापूर चे युनिक अँटोमोबाईलचे उद्योगपती मा. चोरडीया यांच्या वतिने ६,००,००० ( सहा लाख) रूपये किंमतीचा अत्यंत उपयोगी ह्वेंटीलेटर कोविड सेंटरला कोरोना रूग्णाकरीता दिला भेट दिला.
तसेच कल्याणी सखीमंचच्या अध्यक्षा सौ.विद्याताई पोळ यांनी सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कुल व इतर संस्थाच्या वतीने २,५१,००० दोन लाख एक्कावन्न हजार रूपये कोविड सेंटरला मदत जाहीर केली.
शिवाय श्री विजयसिंह यादव प्रतिष्ठान च्या वतीने कोविड सेंटरला चहा नाष्टा , व दोनवेळच्या जेवनाची सोय करण्यात आली आहे.
तसेच यावेळी शिवाजीराव सालपे फाऊंडेशन याच्यांवतीने १,००,००० लाख रूपये,
तसेच वडगांव शहरातील माजी.नगरसेवक राजकुमार पोळ यांचे कडून २१,००० हजार रूपये ,
सामाजिक कार्यकर्ते अभिजीत गायकवाड (दादा) यांचेकडून ११,००० हजार रूपये ,
सामाजिक कार्यकर्ते कमलेश शिरवडेकर (मामा) यांचे कडून ५,००० हजार रूपये,
राष्ट्रवादी काँग्रेस चे माजी शहर अध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांचेकडून ५,००० हजार रूपये ,
दै.पुढारीचे पत्रकार संजय दबडे यांनी ५००० हजार रूपये,
इत्यादी देणगी स्वरूपात रक्कम वडगांव कोविड सेंटरला प्राप्त झाली.
तसेच वडगांव व्यापारी असोसियन च्या वतीने दोन ईसीजी मशीन आणि १००० मास्क यावेळी देण्यात आले.
यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी वडगांव मधील काही खाजगी रूग्णालयात जादा बिलाची आकारणी करणाऱ्या डाँक्टरांची चौकशी करण्याचे आदेश पालिकेच्या मुख्याधिकारी सौ.सुषमा शिंदे यांना दिले.
यावे मुख्याधिकारी सौ.शिंदे यांनी प्रतेक वार्डामधे थर्मल गण मशिन मार्फत सर्व नागरिकांची तपासणी करत आहे असे सांगितले .
तसेच मंत्री पाटील यांनी नागरिकांनी कोरोनाची लक्षणे आढळल्यास तात्काळ रूग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत हा आजार लपवून ठेवण्या सारखा नाही असे उदगार काढले.
कोविड सेंटरला अजुन कसलीही मदत लागलेस ताबडतोब मला कळवावे जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने सांगितले .
तसेच वडगांवच्या आई महालक्ष्मीला प्रार्थना करतो कि या कोविड सेंटरला कोरोनाचा एकही रूग्ण न मिळो असे पालकमंत्री सतेज पाटील या कोविड भेट प्रसंगी म्हणाले .
तसेच पालिकेच्या मुख्याधिकारी यांनी मंत्री पाटील यांचेकडे कोविड सेंटरमधे दोन मेडीकल आँफिसर असुन आणखी चार मेडिकल आँफिसर द्यावेत अशी मागणी केली.
तात्काळ चार मेडिकल आँफिसर वडगांव कोविड सेंटराला देण्याचे आश्वासन मंत्री पाटील यांनी दिले.
यावेळी मा.मंत्री साहेब आणि आमदार आवळे साहेबांनी चोरडिया कुठूंबाचे आभार मानले.
तसेच यावेळी हातकणंगलेचे तालुक्याचे तहसिलदार , प्रांताधिकारी सो ,वडगांवचे नगराध्यक्ष मोहनलाल माळी सो.उपनगराध्यक्ष शरद पाटील व सर्व आजी .माजी. नगरसेवक ,
वडगांव शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण , माजी.नगरसेवक राजकुमार पोळ , सामाजिक कार्यकर्ते मा.अभिजीत गायकवाड , माजी.नगराध्यक्ष अभिजीत पोळ , युवा नेते सुरज जामदार ,
रणजीतसिंह यादव , युवा उद्योजक विशाल वडगावे , डाँ.अभय यादव ,
पवण पवार , यादव आघाडी आणि सालपे आघाडी चे सर्व नगरसेवक उपस्थित होते .
तसेच वडगांव व्यापारी असोसियन चे व्यापारी बंधू वडगांव नगरीचे नागरिक उपस्थित होते.