• Home
  • *गरीबांना गँस पेक्षा ही स्वस्त पर्याय *उपलब्ध करून देणार ,* *उर्जामंत्री आर.के.सिंह.*

*गरीबांना गँस पेक्षा ही स्वस्त पर्याय *उपलब्ध करून देणार ,* *उर्जामंत्री आर.के.सिंह.*

*गरीबांना गँस पेक्षा ही स्वस्त पर्याय *उपलब्ध करून देणार ,*
*उर्जामंत्री आर.के.सिंह.*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

उर्जामंत्री आर.के. सिंह म्हणाले की, गरीबांना मदत करण्यासाठी स्वयंपाक करताना मोठ्या प्रमाणात वीज वापरण्यास प्रोत्साहन देण्याचा सरकार विचार करत आहे. ऊर्जा मंत्रालयाच्या निवेदनानुसार मंत्री म्हणाले की, समाजातील गरीब घटकांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी स्वस्त पर्याय म्हणून वीज उपलब्ध करुन दिली जाईल. यामुळे देश केवळ आत्मनिर्भरतेकडे घेऊन जाईलच, तर आयातीवरील (पेट्रोलियम) निर्भरता कमी करण्यासही मदत होईल. मंत्र्यांनी एनटीपीसीच्या नबीनगर, बाढ आणि बरौनीमध्ये अनुक्रमे: सर्व्हिस बिल्डिंग, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि मेन प्लांट कॅन्टीनचे उद्घाटन करताना म्हणाले, ही केंद्रे बिहारमधील लोक आणि एनटीपीसी कर्मचार्‍यांच्या सोयीसाठी तयार केली गेली आहेत.
सिंह म्हणाले, वीज हे भारताचे भविष्य आहे आणि आगामी काळात देशातील बहुतेक मूलभूत सुविधा विद्युत उर्जेवर अवलंबून असतील. ते म्हणाले की, सरकारने मंत्रालय स्तरावर पॉवर फाउंडेशन स्थापनेचा प्रस्ताव दिला आहे. स्वयंपाकात फक्त वीज वापरणे हे या लक्ष्यांमध्ये समाविष्ट आहे. यामुळे आपली अर्थव्यवस्था आत्मनिर्भरच होणार नाही, तर आयातीवरील अवलंबन कमी करण्यासही मदत होईल. सिंह म्हणाले की, आमचे सरकार गरिबांच्या हितासाठी काम करत आहे आणि हे पाऊल समाजातील गरीब वर्गाला स्वयंपाकासाठी स्वस्त पर्याय उपलब्ध करेल.
ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन दरम्यानही गरिबांना लक्षात घेऊन पीएम आवास योजना आणि हर घर बिजली यासारख्या योजनांवर काम सुरू ठेवले आहे. एनटीपीसीच्या विविध प्रयत्नांचे मंत्र्यांनी कौतुक केले, जे देशाच्या आर्थिक विकासासाठी या वीज उत्पादक कंपनीची बांधिलकी दर्शवते.
ते म्हणाले, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या कामकाजावर नेहमीच प्रश्न उपस्थित केले जातात, पण जर एनटीपीसी आणि सार्वजनिक क्षेत्रातील इतर उपक्रमांच्या कामगिरीकडे पाहिले तर हे स्पष्ट होते की, त्याचे प्रयत्न इतर खासगी कंपन्यांपेक्षाही चांगले राहिले आहेत आणि प्रगतीसह नफाही मिळवत आहेत. राष्ट्र निर्माण करण्यासाठी बिहार आणि अन्य राज्यांच्या प्रगतीमध्ये उल्लेखनीय भागीदार ठरलेल्या एनटीपीसीचा मी आभारी आहे.
यावेळी एनटीपीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गुरदीप सिंह म्हणाले, एनटीपीसी स्वयंपाकात विजेच्या वापरास प्रोत्साहित करण्यासाठी सर्व शक्य पावले उचलत आहे. आम्हाला विश्वास आहे की, आम्ही या मॉडेलचे अनुकरण देशभर करू शकू. ते म्हणाले की, एनटीपीसी बिहारमध्ये ३,८०० मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प निर्माणाधीन आहे आणि कंपनी राज्याच्या प्रगतीसाठी हातभार लावेल. एनटीपीसी समूहाची एकूण स्थापित क्षमता ६२,९०० मेगावॅट आहे. यात ७० पॉवर स्टेशन आहेत.

anews Banner

Leave A Comment