Home नाशिक नाशिकमध्ये एसटीचा भीषण अपघात – महिला कंडक्टरसह एका प्रवाशाचा मृत्यू

नाशिकमध्ये एसटीचा भीषण अपघात – महिला कंडक्टरसह एका प्रवाशाचा मृत्यू

118

आशाताई बच्छाव

IMG-20230407-WA0092.jpg

नाशिकमध्ये एसटीचा भीषण अपघात
– महिला कंडक्टरसह एका प्रवाशाचा मृत्यू

मुंबई : ( प्रतिनिधी विजय पवार )
नाशिकमधील देवळा मनमाड मार्गावर एसटीचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये महिला कंडक्टरचा मृत्यू झाला असून एका प्रवासीचाही यामध्ये मृत्यू झाला आहे. तसेच, एसटीमधील अनेक प्रवासी जखमी झाले असून जवळच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
देवळा मनमाड मार्गावर असलेल्या चांदवड शहरानजीक मतेवाडीजवळ एसटीचा भीषण अपघात झाला. ही एसटी मनमाड आगारातून सुटून नांदुरीकडे जात होती. यामध्ये एसटीची महिला कंडक्टरचा जागीच मृत्यू झाला. तर, एका प्रवाशी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातामध्ये २० ते २५ प्रवासी जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, समोरून येणाऱ्या वाहणारे एसटी बसला कट मारल्याने एसटीचा रॉड तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. एसटी थेट रस्त्याकडेच्या झाडावर आपटली आणि हा भीषण अपघात झाला. या एसटीच्या एका बाजूचा संपूर्ण चक्काचूर झाला.

Previous articleश्री प्रकाश चव्हाण सर यांचा सेवापु्र्ती सोहळा संपन्न
Next articleअमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णत ९९ रुग्णांची नोंद पॉझिटिव्ह वाढली, अन लस संपली, आठ दिवसापासून लसीकरण बंद; पुरवठ्याची प्रतीक्षा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.