Home अमरावती अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णत ९९ रुग्णांची नोंद पॉझिटिव्ह वाढली, अन लस संपली,...

अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णत ९९ रुग्णांची नोंद पॉझिटिव्ह वाढली, अन लस संपली, आठ दिवसापासून लसीकरण बंद; पुरवठ्याची प्रतीक्षा

36
0

आशाताई बच्छाव

IMG-20230407-WA0103.jpg

अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णत ९९ रुग्णांची नोंद पॉझिटिव्ह वाढली, अन लस संपली, आठ दिवसापासून लसीकरण बंद; पुरवठ्याची प्रतीक्षा
दैनिक युवा मराठा नेटवर्क.
पी एन देशमुख.
ब्युरो चीफ.
अमरावती.
दोन आठवड्यापासून कोरोना ने डोके वर काढले आहे. सध्या ३७ सक्रिय रुग्ण आहेत. रोज पाच ते दहा पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद होत असताना अमरावती जिल्हात सर्व लसीचा साठा संपल्याने लसीकरण ठप्प आहे. त्यामुळे कसे लढणार कोरोनासी, असा नागरिकांचा चर्चेतून सवाल आहे. अमरावती जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. महिन्याभरात ९९रुग्णांची नोंद झाली. नमुन्यामध्ये पॉझिटिव्ह देखील वाढती आहे. कोरोना विषाणूचा नव्या व्हेरीऑंटीची लक्षणे सौम्य आहेत. त्यामुळे बहुतेकडून गृह वर्गीकरण उपचार घेत आहे. सध्या स्थिती ग्रामीण भागात दोन महानगरपालिका क्षेत्रात 35 सक्रिय रुग्ण आहेत. कोरोना संसर्ग वर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरण हे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे शासन, प्रशासन व आरोग्य विभागाद्वारे लसीकरणावर जोर आहे. जिल्ह्यात १७ जानेवारी २०२१ पासून लसीकरण सुरू झाले आहे. अद्याप ५० टक्के नागरिकांनी बूस्टर डोस घेतलेले नाही. लसीकरणासाठी शहरात १२ते१५व ग्रामीणमध्ये प्रत्येक तालुक्यात व मोठ्या पी एच सी मध्ये लसीकरण होत आहे. विशेष म्हणजे झालेल्या नागरिकांना संसर्ग झाला तरीही लक्षणे सौम्य असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

Previous articleनाशिकमध्ये एसटीचा भीषण अपघात – महिला कंडक्टरसह एका प्रवाशाचा मृत्यू
Next articleअनुसूचित जातीच्या 861 संशोधकांना फेलोशिप नाकारण्याची राज्य सरकारची भूमिका अन्यायकारक.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here