Home विदर्भ मुरूमाच्या वाहन परवाना वरील गाडी क्रमांकाची नोंद रद्द करा आमदार डॉक्टर देवरावजी...

मुरूमाच्या वाहन परवाना वरील गाडी क्रमांकाची नोंद रद्द करा आमदार डॉक्टर देवरावजी होळी

202
0

राजेंद्र पाटील राऊत

मुरूमाच्या वाहन परवाना वरील गाडी क्रमांकाची नोंद रद्द करा

आमदार डॉक्टर देवरावजी होळी

जी गाडी उपलब्ध असेल त्या गाडीचा नंबर वाहतूक परवाना वर नोंदविण्यास परवानगी देण्यात यावी

नोंदणीकृत गाडी खराब झाल्यावर दुसऱ्या गाडीने वाहतूक केल्यास खदान व गाडी मालका वर आकारला जाणारा दंड अन्यायकारक

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

मुरुमाचा वाहन परवाना देताना खदान धारकाकडून वाहतूकीसाठी काही विशिष्ट गाड्यांचे नंबर नोंदणीकृत करून घेतले जातात. नोंदणीकृत गाडीनेच मुरमाची वाहतूक करण्याची परवानगी दिली जाते.यामुळे एखाद्या वेळेस नोंदणीकृत गाडी खराब झाल्यास वेळेवर उपलब्ध होणाऱ्या गाडीने मुरमाची वाहतूक केल्यास खदान धारक व गाडी मालकावर दंड आकारला जातो. सदर बाब खदान धारक व गाडी मालकावर प्रचंड अन्याय करणारी असून मुरमाच्या परवाना वरील गाडी क्रमांकाची नोंद तात्काळ रद्द करावी व वाहतूक परवाण्यावर वर उपलब्ध गाडीचा नंबर लिहिण्यास परवानगी देण्यात यावी. अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

मुरुमाची वाहतूक करताना वाहतूक परवाण्यावर (टी.पी.) वर जा गाड्यांची नोंद आहे त्याच गाड्यांच्या द्वारे मुरुमाची वाहतूक करण्यास प्रशासनाने बंधनकारक केल्याचे समजले. असे केल्यास एखाद्या वेळेस नोंदणीकृत गाडीमध्ये बिघाड पडल्यास उपलब्ध गाडीने मुरमाची वाहतूक केल्यास त्यावर दंड आकारला जातो. यामुळे खदान धारक व गाडी मालक दोघांचेही आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे मुरुमाच्या वाहन परवान्यावर नियोजित गाडी क्रमांकाची नोंद रद्द करावी व जी गाडी त्या वेळी उपलब्ध राहील त्या गाडीचा नंबर वाहतूक परवान्यावर नोंद करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी आमदार डॉ.देवरावजी होळी यांनी शासनाला केली आहे.

Previous articleपिंपळगाव बसवंत येथे अल्पवयीन मुलाची आत्महत्या
Next articleनिफाडच्या कारसुळ नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here