Home विदर्भ पेट्रोल – डिझेल दरवाढ मागे घ्या केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी

पेट्रोल – डिझेल दरवाढ मागे घ्या केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी

175

राजेंद्र पाटील राऊत

पेट्रोल – डिझेल दरवाढ मागे घ्या
केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी
तहसील कार्यालया समोर शिवसेनेन केला निषेध

नागपूर (देवेंन्द्र थोटे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
पेट्रोल – डिझेल दरवाढ मागे घेण्यात यावी , अशी मागणी करीत शिवसेनेन तहसील कार्यालया समोर केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत निषेध केला. शिवसेना जिल्हाप्रमुख राजु हरणे यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी तहसील कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली . यावेळी हरणे म्हणाले , पेट्रोल ९४ रुपये लिटर तर डिझेल ८३ रुपये झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलचे दर वाढविल्याने ट्रान्सपोर्ट व्यवसायाला फटका बसला आहे.
तेव्हा केंद्र सरकरने पेट्रोल व डिझेलचे दर कमी करावेत . कोरोना संक्रमणामुळे अनेकांची आर्थिक स्थिती दयनीय झाली आहे. शेतकरी या वर्षी मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे चिंतेत आहे. त्यात आंब्या बहाराच्या संत्र्याला भाव नव्हते. मृग बहाराची संत्री खुप कमी प्रमाणात आहे. यावर्षी शेती ला लावलेले पैसे सुद्धा शेतकऱ्यांच्या हाती आले नाही. अश्यावेळी केंद्रसरकारने नागरिकांना दिलासा देण्याएवजी पेट्रोल – डिझेलचे दर वाढवून सर्वसामान्यांची लुट केली आहे. रोजगार नसल्याने युवक हतबल झाला आहे. छोटे – मोठे व्यवसाय ढप्प अवस्थेत आहे.
अशावेळी डिझेल – पेट्रोलची दरवाढ करून आर्थिक फटका बसला आहे. यावेळी प्रामुख्याने शिवसेना तालुकाप्रमुख हिंम्मत नखाते , युवासेना तालुका प्रमुख ललित खंडेलवाल , अजय बालपांडे , भारत अरमरकर , हिराचंद कडू , दिनकर फुले , किसना शेळके , उमेश फुले , हंसराज गिरडकर , निखील जिचकार , उमेश बनाईत , मनिष काटोले , प्रफ्फुल दारोकर , चंद्रकांत जिचकार , हर्षल ढोरे , रमेश रेवतकर , बालु चौधरी , वासुदेव जिचकार , योगेश राऊत , डिगांबर पाटील , पिंटू मानकर , प्रशांत गायधने , संजय बारमासे , राकेश बोदड , कैलास डांगोरे , रामाजी ठाकरे , विवेक बालपांडे , दिलीप राऊत , योगेश पानोरे , रुपराव उमक , महादेव काळे , नाना काटोले , विक्की बारमासे , विक्रम मानकर , संदीप सातपूते , शशिकांत चरपे सह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

Previous articleमहाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपूरच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाची कार्यकारिणी जाहीर
Next articleमराठा आरक्षणाची सुनावणी ८ मार्च पासून १० दिवसांचं सर्वोच्च न्यायालय 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.