Home नाशिक मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी मायबोली मराठी अस्मिता जोपासली जावी

मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी मायबोली मराठी अस्मिता जोपासली जावी

55
0

आशाताई बच्छाव

IMG_20240220_071354.jpg

मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी मायबोली मराठी अस्मिता जोपासली जावी

निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे

महाराष्ट्राला अनेक थोर, महान साधुसंतांचा सहवास लाभला आहे. त्या महाराष्ट्राच्या पावन भूमीत मी जन्माला येणे स्वतःचे अहो भाग्य.महाराष्ट्राला अनेक थोर, महान साधुसंतांचा सहवास लाभला आहे. त्या महाराष्ट्राच्या पावन भूमीत मी जन्माला येणे स्वतःचे अहो भाग्य समजते. कारण या मातृभूमीला अनेक महान व्यक्तीचा अविस्मरणीय आणि अवर्णनीय इतिहास आहे. या पुण्यभूमीचा वारसा लाभले ही एक अतिशय अभिमानाची, स्वाभिमानाची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महान कर्तृत्वाचा महान वारसा लाभला आहे. महाराष्ट्राच्या भूमीत अनेक ठिकाणी शुर, धाडसी, चपळ मावळ्यांचे रक्त सांडले आहे. आणि ही भूमी पावन झाली आहे. स्वराज्य घडविण्यासाठी किती संघर्ष करावा लागला त्यांना. दिवस रात्र ध्येयाच्या पाठीमागे लागले म्हणून तर त्यांच्या प्रयत्नामुळेच आपण आज स्वातंत्र्य उपभोगू शकतो.
ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रगल्भ ज्ञानामुळे तर आपल्याला अनेक महान विचार मिळाले आणि त्या विचारांना जर आपण सर्वांनी कृतीत उतरवले तर त्यामुळे आपल्या पृथ्वीवर स्वर्ग निर्माण होणार आहे. अशा महान विचारवंताची पार्श्वभूमी लाभलेला महाराष्ट्र हा पूर्ण जगात गाजला आहे. संत ज्ञानेश्वरांचा ज्ञानेश्वरी ग्रंथ, संत तुकारामांचा तुकाराम गाथा, व्यास यांचे महाभारत, वाल्मिकींचे रामायण, श्री. चक्रधर स्वामींचे लिळाचरित्र, श्रीकृष्णाची गीता, असे अनेक महान ग्रंथ या भूमीमध्ये उगम पावले. आपण त्याचे व्यावहारिक उपयोजना करून त्याच्या पावित्र्याचे रक्षण केले पाहिजे. वेद आणि उपनिषदांचा महिमा आपणास लाभला आहे.

रामभाऊ आवारे
राज्य प्रसिध्दी प्रमुख युवा मराठा महासंघ

Previous articleआंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनविशेष —
Next articleमराठवाड्यातील सर्व ठेवीदारांना न्याय मिळेपर्यंत लढा चालूच राहणार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here