Home युवा मराठा विशेष वडनेर खाकुर्डी पोलिस स्टेशनची स्थापना का?आणि कुणासाठी? वाचा युवा मराठा चा स्पेशल...

वडनेर खाकुर्डी पोलिस स्टेशनची स्थापना का?आणि कुणासाठी? वाचा युवा मराठा चा स्पेशल रिपोर्ट!

73
0

आशाताई बच्छाव

20220606_081819.jpg

वडनेर खाकुर्डी पोलिस स्टेशनची स्थापना का?आणि कुणासाठी? वाचा युवा मराठा चा स्पेशल रिपोर्ट!
(राजेंद्र पाटील राऊत युवा मराठा न्युज नेटवर्क)
मालेगांव-महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यात असलेल्या वडनेर खाकुर्डी पोलिस स्टेशनची स्थापना का?आणि कुणासाठी झाली? हे एक मोठ्ठेच रहस्य आहे!
त्याची खरी माहिती आजही कित्येकांना नाहीये.तसं बघितल तर मालेगांव तालुक्यात एकूण एकशे चाळीस गावाचा समावेश होतो,संपूर्ण तालुक्यात बहुतेक ठिकाणी औट पोस्ट म्हणून पोलिसांच्या चौक्या कार्यरत आहेत…तर काही ठिकाणी फक्त आता नावालाच औट पोस्ट उरले आहेत.असे असतानाही फक्त वडनेर खाकुर्डीतच स्वतंत्र पोलिस स्टेशनची स्थापना का? व कशासाठी? असा प्रश्न साहजिकच निर्माण होतो.
अगदी ब्रिटीश काळात स्थापन झालेले हे पोलिस स्टेशन आजही मोसम नदीकाठावर मोठया दिमाखात उभे आहे.काटवन परिसर म्हणून ओळखला जाणारा हा वडनेर खाकुर्डीचा भाग पुर्वी घनदाट अशा जंगलाने व्यापलेला होता.याच परिसरातल्या खाकुर्डी गावात गुलब्या फराडी नावाचा मोठा दरोडेखोर नावारुपास आलेला होता.गुलब्या फराडी हा नावालाच दरोडेखोर होता.श्रीमंत व सावकार लोकांना लुटून तो लुटलेला ऐवज गोरगरिबांना वाटत होता,म्हणून तो गरिबांचा मसिहा देवता म्हणून ओळखला जात होता.भिल्ल समाजात जन्माला आलेल्या या गुलब्या फराडीने ब्रिटिशकालीन पोलिसांची अक्षरशः झोप उडविली होती.पुर्वीच्या काळी आजच्या सारख्या सोयी सुविधा नव्हत्या आरोपीला पकडायला जाताना पोलिसांना घोडयावरुन जावे लागत होते.गुलब्या फराडीचा शोध तपास घेऊनही ज्यावेळेस गुलब्या फराडी सापडत नाही.असे दिसून आल्यावर ब्रिटिश पोलिसांनी वडनेर खाकुर्डी येथे स्वतंत्र पोलिस स्टेशनची स्थापना केली.सहाय्यक पोलिस निरिक्षक A.P.I दर्जाचे असलेले हे पोलिस स्टेशन अखेरच्या क्षणापर्यत गुलब्या फराडीला पकडू शकले नाही असे आजही त्या भागातले लोक सांगतात.
मात्र नंतरच्या काळात याच पोलिस स्टेशनने महाराष्ट्राला अनेक नावलौकिक प्राप्त अधिकारी दिलेत.२६/११ च्या मुंबई ताज अतिरेकी हल्ल्यातील शहीद अशोक कामटे यांनी आपल्या नोकरीची सुरुवात याच वडनेर खाकुर्डी पोलिस स्टेशनला ए.पी.आय.या पदापासून केलेली होती.नंतरच्या काळात सुभाष नेवे,नरेंद्र पिंगळे,रखमाजी उकीर्ड,कृष्णा सोनी,संदीपकुमार बोरसे,राऊत,रामेश्वर मोताळे ,देवेंन्द्र शिंदे सारख्या अधिकाऱ्यांनी आपली सेवा चोख बजावली आहे.

Previous articleपिंगळवाडे व परिसरात शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा.
Next articleश्री सुभाष ढवळे यांचा हाळगाव येथे सत्कार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here