Home नाशिक पिंगळवाडे व परिसरात शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा.

पिंगळवाडे व परिसरात शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा.

56
0

आशाताई बच्छाव

IMG-20220606-WA0083.jpg

पिंगळवाडे व परिसरात शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा.

संदीप गांगुर्डे पिंगळवाडे युवा मराठा न्युज नेटवर्क

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज शिवराज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात सगळीकडे उत्साहात साजरा झाला. याच अनुषंगाने पिंगळवाडे येथे हा सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. प्रथमता सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत कार्यालयात झाले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते गंगाधर भामरे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास हार गावातील तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भामरे यांनी अर्पण केला. नारळ वाढवण्यासाठी गावातील माजी सरपंच अंतू भांमरे उपस्थित होते. याप्रसंगी गावातील नागरिक सकाळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात गोकुळ भामरे,कौतिक भामरे, विठ्ठल भामरे, प्रदीप भामरे, वाघ सर, काशिनाथ भामरे, संजय भामरे, अभिमन भामरे, परसराम बागुल, संतोष वाघ, सूनील भामरे सचिन भामरे,गणेश बोरसे,सौ मंगल भामरे,सौ अश्विनी भामरे, श्रीमती सुनिता भामरे,श्रीमती सुनंदा बच्छाव,सौ योगिता कोठावदे, आधी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous articleताहाराबाद गणासाठी तरुणांची उत्सुकता वाढली.
Next articleवडनेर खाकुर्डी पोलिस स्टेशनची स्थापना का?आणि कुणासाठी? वाचा युवा मराठा चा स्पेशल रिपोर्ट!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here