Home नाशिक ताहाराबाद गणासाठी तरुणांची उत्सुकता वाढली.

ताहाराबाद गणासाठी तरुणांची उत्सुकता वाढली.

62
0

आशाताई बच्छाव

IMG-20220606-WA0026.jpg

ताहाराबाद गणासाठी तरुणांची उत्सुकता वाढली.
संदीप गांगुर्डे पिंगळवाडे युवा मराठा न्युज नेटवर्क
ताहाराबाद गटाची पुनर्रचना झाल्याने यात बहुतांशी नवीन गावांचा समावेश झाला आहे. यामुळे बहुतांश तरुण उमेदवारांचा ओघ ताहाराबाद गणाकडे लागल्याची चिन्हे आता दिसू लागली आहे. हा गण सर्वसाधारण किंवा इतर मागास प्रवर्गासाठी खुला असू शकतो अशी अपेक्षा बहुतेक उत्सुक उमेदवारांना वाटत आहे. यात सर्वपक्षीय व कार्यकर्ते आपली प्रतिष्ठा पणाला लावतील अशी अपेक्षा वाटते. ताहाराबाद पंचायत समिती गणासाठि भाजपच्या वाटेवर असणारे किंवा इच्छुकांनी भाजपकडे रांग लावली आहे. सध्या ताहाराबाद शहर भाजपा तालुका उपध्यक्ष रवी मानकर भाजपाचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. तसेच मुकेश साळवे भाजपाचे व सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे जनसंपर्क चांगला आहे .तसेच भडाणे गावचे उपसरपंच निलेश भामरे यांचा जनसंपर्क व मोठा मित्र परिवार आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपळकोठे चे माजी सरपंच नितीन भामरे यांच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे. नितिन भामरे माजी आमदार संजय चव्हाण यांचे जवळचे सहकारी असल्याने त्यांना याचा मोठा फायदा होऊ शकतो त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाकडून ताहाराबाद गावचे तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ते अरुण नंदन यांच्या नावाची चर्चा आहे

Previous articleअजमीर सौंदाणेत आय.पी.एस.प्रतापराव दिघावकर यांचा नागरी सत्कार संपन्न
Next articleपिंगळवाडे व परिसरात शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here