• Home
  • धन्यवाद, सुजाण पुणेकरांनो

धन्यवाद, सुजाण पुणेकरांनो

🛑 *धन्यवाद, सुजाण पुणेकरांनो* ! 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे ⭕कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरच्या गणपतीचे घरीच विसर्जन करावे आणि सार्वजनिक मंडळातील गणेश मूर्तीचे मंडपात विसर्जन करावे, असे आवाहन आपण केले होते. या आवाहनास आपण पुणेकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून बहुतांश पुणेकरांनी दीड दिवसाच्या घरच्या श्री. गणेश मूर्तीचे विसर्जन घरीच केले आहे. पुणे महानगरपालिकेने एका क्षेत्रिय कार्यालयात दोन या प्रमाणे तीस पर्यावरणपूरक श्री गणेश विसर्जन फिरते हौद नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. ज्यांना घरी विसर्जन करणे शक्य झाले नाही, अशा सुमारे १ हजार २०० च्या जवळपास भाविकांनी महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या या फिरत्या हौदांमध्ये श्री गणेश मूर्तीचे विसर्जन केले.

गेल्या वर्षी दीड दिवसांच्या १३ हजार ८५८ मूर्तीचे विसर्जन करण्यात आले होते. यंदाच्या वर्षी केवळ १२०० मूर्ती या फिरत्या विर्सजन हौदामध्ये विसर्जित केल्या गेल्या. याचाच अर्थ ९० टक्के पुणेकरांचा आपल्या बाप्पाचे घरीच विसर्जन करण्याकडे कल दिसला आहे. याबद्दल समस्त पुणेकरांचे मनःपूर्वक आभार आणि यापुढेही घरच्या घरीच विसर्जन करण्याकडे पुणेकरांनी प्राधान्य द्यावे, ही मनापासूनची विनंती !⭕

anews Banner

Leave A Comment