• Home
  • रोहा तालुक्यातील तांबडी येथील……! पीडित मुलीच्या घरी जाऊन त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी घेतली

रोहा तालुक्यातील तांबडी येथील……! पीडित मुलीच्या घरी जाऊन त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी घेतली

🛑 *रोहा तालुक्यातील तांबडी येथील……! पीडित मुलीच्या घरी जाऊन त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी घेतली* 🛑
✍️ रायगड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

रोहा/रायगड ⭕आरोपीना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे
मराठाक्रांतीमोर्चामहाराष्ट्र मराठाक्रांतीमोर्चामहामुंबई

रोहा तालुक्यामध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर सदर पीडितेला न्याय मिळावा व आरोपीला लवकरात लवकर फाशी मिळावी यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री श्री अनिल देशमुख साहेब यांची आज मंत्रालयात भेट घेतली.

सदर घटनेबाबत मराठा समाजामध्ये प्रचंड रोष असून कोपर्डीच्या बहिणीला वेळेत न्याय दिला नाही त्यामुळे अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्र मध्ये पुन्हा होत आहेत व त्याबाबत सरकारने गंभीर भूमिका घ्यावी अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चा तर्फे ठेवण्यात आली. आरोपींना तात्काळ फाशी व्हावी यासाठी सदर केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालावी, त्याचबरोबर माननीय उज्वल निकम साहेबांची विशेष सरकारी वकील म्हणून सदर प्रकरणांमध्ये नियुक्ती व्हावी त्यासोबत पिडीत कुटुंबाला पुरेसे संरक्षण देण्यात यावे या मागण्या गृह मंत्र्यांकडे ठेवण्यात आल्या. पीडित कुटुंबाला पुरेसे संरक्षण दिले गेले आहे.

त्याचप्रमाणे सदर प्रकरणाचा तपास व्यवस्थित चालू आहे व आरोपींना नक्कीच फाशी मिळेल अशा प्रकारचे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिले सदर प्रकरणामध्ये सरकारतर्फे विशेष सरकारी वकील म्हणून सरकारची बाजू मांडण्यासाठी उज्ज्वल निकम साहेब यांची संमती सरकारला प्राप्त झाली असून त्यामुळे माननीय उज्ज्वल निकम साहेब यांची सदर प्रकरणात नियुक्ती होण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे.

त्याचप्रमाणे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालावे यासाठी योग्य ते प्रक्रिया करण्यात येईल असे आश्वासन गृहमंत्र्यांनी संपूर्ण मराठा समाजाला दिलेले आहे. मराठा क्रांती मोर्चा तर्फे आज वीरेंद्र पवार, अंकुश कदम, मंदार जाधव, संभाजी दहातोंडे हे सदर बैठकीत उपस्थित होते..⭕

anews Banner

Leave A Comment