Home अमरावती आचार्य विद्यासागर महाराजांना खा. डॉ.अनिल बोंडे यांनी अर्पण केली विनयांजली

आचार्य विद्यासागर महाराजांना खा. डॉ.अनिल बोंडे यांनी अर्पण केली विनयांजली

21
0

आशाताई बच्छाव

IMG_20240226_202745.jpg

आचार्य विद्यासागर महाराजांना खा. डॉ.अनिल बोंडे यांनी अर्पण केली विनयांजली

श्रीक्षेत्र नागठाणा येथे स्मृतींना उजाळा

भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती 
गजानन जिरापुरे
ब्युरो चीफ अमरावती
अमरावती : ‘वर्तमान के वर्धमान’ अशी जगभरात खाती असलेले आध्यात्मिक जैन धर्मगुरू प्रवर 108, परमपूज्य विद्यासागरजी महाराज यांचे अलीकडेच महाप्रयाण झाले. त्यापार्श्वभूमिवर वरुड तालुक्यातील जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र नागठाणा येथे रविवारी (ता.२५) राज्यसभा सदस्य खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी विद्यासागर महाराज यांना विनयांजली अर्पण केली.

‘जीव दया ही परमधर्म’ असा मौलिक विचार देऊन समाजात अभूतपूर्व क्रांतिकारी परिवर्तन घडवणारे परमपूज्य आचार्य संत शिरोमणी विद्यासागर महाराज यांचे १७ फेब्रुवारी रोजी छत्तीसगड स्थित डोंगरगडाच्या चंद्रगिरी येथील आश्रामात देवलोक गमन झाले. विद्यासागर महाराजांनी त्यांच्या आयुष्यात समाजात अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य, सेवा प्रकल्प हाती घेतले होते. त्यांचे आशीर्वाद सदैव राज्यसभा खासदार डॉ.अनिल बोंडे यांना लाभले. त्यामुळे ते धार्मिक व सामाजिक कार्यात अग्रेसर राहुन सामाजिक उत्तरदायित्व पूर्ण करण्यासाठी स्वतःला झोकून देतात. जैन धर्मियांचे तीर्थस्थान असलेल्या मुक्तागिरी येथे काही दिवसापूर्वी श्री विद्यासागर महाराज आले होते. त्यावेळी देखील डॉ. अनिल बोंडे यांनी त्यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले होते. त्या अनुषंगाने डॉ.अनिल बोंडे हे आज वरुड तालुक्यातील श्रीक्षेत्र नागठाणा येथे गेले असता त्यांनी आचार्य विद्यासागर महाराज यांना विनयांजली अर्पण केली. शेकडो भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमादरम्यान महाराजांच्या स्मृतीला देखील डॉ. बोंडे यांनी उजाळा दिला. यावेळी डॉ. मनोहर आंडे, अमित कुबड़े, श्रीधर सोलव, नीलकंठ मुरूमकर, भाजपा तालुका अध्यक्ष राजकुमार राऊत, शेंदुर्जनाघाटचे अध्यक्ष निलेश फुटाणे, विशाल सावरकर, नागठाणा आश्रमाचे पदाधिकारी व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleचाळीसगाव महाविद्यालयाच्या वतीने नदी स्वच्छता मोहीम
Next articleआसोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत शेतकरी गटाचे प्रशिक्षण
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here