Home जळगाव चाळीसगाव महाविद्यालयाच्या वतीने नदी स्वच्छता मोहीम

चाळीसगाव महाविद्यालयाच्या वतीने नदी स्वच्छता मोहीम

90
0

आशाताई बच्छाव

IMG_20240226_202442.jpg

चाळीसगाव महाविद्यालयाच्या वतीने नदी स्वच्छता मोहीम

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील-
चाळीसगाव महाविद्यालयाच्या वतीने डोंगरी आणि तितुर नदी किनाऱ्याची एनसीसी चे छात्र सैनिकानी स्वच्छता केली.
48 महाराष्ट्र बटालियन एनसीसी धुळ्याचे कर्नल शैलेंद्रकुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाने डोंगरी आणि तितूर नदीपात्राच्या किनाऱ्याची एनसीसीच्या छात्र सैनिकांनी स्वच्छता अभियान राबवले या अभियानात बेबी गर्ल्स हायस्कूलच्या चाळीस एनसीसी छात्र सैनिक तसेच ए एस सी कॉलेज चाळीसगावचे 40 छात्र सैनिक यांनी सहभाग नोंदवला.
या विध्यार्थ्यांना महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अजय काटे यांनी मार्गदर्शन केले. आपल्या शुभेच्छा पर भाषणात स्वच्छतेला जीवनात किती महत्त्व आहे हे पटवून दिले.
या कार्यक्रमासाठी मॅनेजिंग बोर्डाचे चेअरमन नारायण अग्रवाल, व्हाईस चेअरमन योगेश अग्रवाल, सीनियर कॉलेज कमिटीचे चेअरमन सुरेश स्वार यांनी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे एनसीसी अधिकारी लेफ्टनंट डॉ. राजेश चंदनशिव, ट्रेनिंग ऑफिसर अहिरे मॅडम ह्या उपस्थित होत्या.

Previous articleबीड जिल्ह्यातील बस व इंटरनेट सेवा बंद; बीड-जालना जिल्ह्याची बॉर्डर सील
Next articleआचार्य विद्यासागर महाराजांना खा. डॉ.अनिल बोंडे यांनी अर्पण केली विनयांजली
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here