Home नांदेड परमपूजनीय गोळवलकर गुरुजी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

परमपूजनीय गोळवलकर गुरुजी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

48
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220414-WA0107.jpg

परमपूजनीय गोळवलकर गुरुजी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर- परमपुजनीय गोळवलकर गुरूजी प्राथमिक विद्यालयात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक दमन देगावकर, प्रमुख उपस्थिती वसंत वाघमारे व प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक डॉ. हरिदास भोईवार उपस्थित होते. प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. बुद्ध वंदना स्नेहल माथुरे,श्रद्धा वाघमारे, तनिष्का वाघमारे या विद्यार्थीनीनी सादर केली. प्रमुख वक्त्यांनी आपल्या मार्गदर्शनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील कार्याची ओळख करून दिली. सर्व जाती या समान आहेत. अस्पृश्यता ही समाजाने निर्माण केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिला आर्थिक सक्षम व्हावेत म्हणून संपत्तीचा भागीदारीचा हक्क महिलांना बहाल केला. व्यक्तीच्या शिक्षणावरून व्यक्तीची प्रगल्भता समजत नाही तर त्यांच्या सामाजिक कार्यामुळे समजते. नेतृत्व व कर्तुत्व जातीवर ठरत नाही तर ते कार्यावर ठरते याचे उत्तम उदाहरण हे बाबासाहेब आंबेडकर आहेत. असे प्रतिपादन केले. अध्यक्ष समारोप देगावकर यांनी केले. सूत्रसंचालन स्मिता कुलकर्णी यांनी केले.पद्य सुरशेटवार यांनी गायले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेळके यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here