Home नांदेड उंद्री (प.दे.)ता. मुखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती मोठ्या उत्साहात...

उंद्री (प.दे.)ता. मुखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

56
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220414-WA0082.jpg

उंद्री (प.दे.)ता. मुखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
आज मुखेड तालुक्यातील उंद्री प .दे.येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत सदस्य शंकरराव गुरुजी पंदनवाड यांच्या हस्ते पूजन करुन अभिवादन करण्यात आले. तदनंतर उंद्री नगरीचे सरपंच श्रीमती वनिताताई गनलेवार यांच्या हस्ते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थित सर्व बौद्ध उपासक-उपासिकानी तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी माजी सरपंच शिवाजी पंदनवाड, राजू पाटील सूर्यवंशी, ज्ञानेश्वर पाटील वडजे, आकाश पाटील वडजे, नागेश गुरुजी कोंदापुरे, संजय चव्हाण सर, भगवान पाटील, उत्तम पाटील, न्याजुसाब शेख, बाबूजी वाघमारे सह गावातील जेष्ठ नागरिक, विविध पदाधिकारी, बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleपरमपूजनीय गोळवलकर गुरुजी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
Next articleमेशीत डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here