Home विदर्भ निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमीत जागा नियमानुकूल करण्यासाठी मंगरूपीर शिवसेना पुढाकार घेणार

निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमीत जागा नियमानुकूल करण्यासाठी मंगरूपीर शिवसेना पुढाकार घेणार

82
0

राजेंद्र पाटील राऊत

निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमीत जागा नियमानुकूल करण्यासाठी मंगरूपीर शिवसेना पुढाकार घेणार

मंगरुळपीर(रितेश गाडेकर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- निवासी प्रयोजनासाठी आठ वर्षापूर्वी अतिक्रमण केलेल्या नागरिकांना ते राहात असलेले घर नियमानुकूल करण्याची तयारी शासनाने दाखवली आहे. मंगरूळपीर शहरातील झोपडपट्टी मधील सुमारे तीन हजार पेक्षाही जास्त अतिक्रमित रहिवाशांना हक्काचा निवारा उपलब्ध करून देण्यासाठी आता मंगरूळपीर येथील शिवसेनेचे विवेक नाकाडे आणि सचिन परळीकर पुढाकार घेणार असल्याने गरजूंना आता हक्काचे निवाले प्राप्त होण्यास मार्ग सुकर होणार आहे. शासनाने 2020 पर्यंत सर्व बेघर कुटुंबांना घर देण्याची मोहीम सुरु केली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरी भागात स्वतःची जागा, वार्षिक उत्पन्न या निकषाच्या आधारे लाभार्थ्यांची निवड केली जाते. परंतु पात्र लाभार्थ्यास स्वतःची जागा नसणे किंवा महसूल अखत्यारीत असलेल्या जमिनीवर अतिक्रमण धारकाचे प्रमाण भरपूर आहे.
अशा लाभार्थ्यास जर त्याला स्वतः घर बांधायची झाल्यास अन्य पर्याय नसतो. त्यामुळे त्याला सरकारी जमीन उपलब्ध करून देण्याची तयारी शासनाने दाखवली आहे. तशा हालचालीही सुरू आहेत. मोठ्या झोपडपट्ट्या या योजनेअंतर्गत पालिकेने या पूर्वीचे सर्वेक्षण केले आहे. हक्काचे घर मिळावे म्हणून पालिकेकडे काही अर्ज यापूर्वीच प्राप्त झाले आहेत. यात शहरातील महसुला च्या जागेवर 2011 पूर्वीपासून असलेल्या बऱ्याच झोपडपट्टीतील सर्वच रहिवाशांनी प्रधानमंत्री आवास योजनेतून घरासाठी निकष पूर्ण करून घरांचा लाभ मिळणार आहे.
जागा मालकीचा प्रश्न- झोपडपट्टीच्या मोठ्या जागा महसूलच्या आहेत. आवास योजनेच्या अंमलबजावणीसाठी त्या जागा पालिकेच्या नावावर करणे गरजेचे आहे. या योजनेअंतर्गत अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी गठित समिती असते. या योजनेचा लाभ देण्यासाठी 2011 पूर्वी निवास प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेले भूखंड नियमानुकूल होतील अशे शासन आदेश आहे. असे असताना गरीब गरजू अतिक्रमण जागा धारकांना प्रशासनाने तसेच लोकप्रतिनिधींनीही आतापर्यंत साथ दिली नसल्याने हा प्रश्न मंगरूपीर शहरात अजूनही प्रलंबितच आहे.
परंतु आता शिवसेना या मुद्द्यावर गरीबांच्या पाठीशी राहणार असून शासकीय नियमानुसार अतिक्रमित जागा नियमानुकूल करण्यासाठी शिवसेनेचे विवेक नाकाडे आणि सचिन परळीकर पुढाकार घेणार असून प्रशासकीय स्तरावर या योजनेची माहिती घेऊन पात्र लाभार्थ्यांकडून प्रस्ताव तयार करण्यासाठी कागदपत्रा साठी सर्व खर्च, मदतीसाठी शिवसेनेचे कार्यकर्ते राहणार आहेत. तसेच तयार झालेले प्रस्ताव शासन दरबारी मांडून लोकांना हक्काच्या घरी मिळण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची भूमिका आता मंगरूळपीर शिवसेनेने घेतलेली दिसते.

Previous articleनाशिक(घोटी) येथील व्हर्टिकल फार्मिंग नवउद्योजकासाठी प्रेरणादायी
Next articleवनविभागाच्या कार्यवाहीत बोरी ( बु. ) येथे फर्निचर जप्त
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here