Home नांदेड वनविभागाच्या कार्यवाहीत बोरी ( बु. ) येथे फर्निचर जप्त

वनविभागाच्या कार्यवाहीत बोरी ( बु. ) येथे फर्निचर जप्त

157
0

राजेंद्र पाटील राऊत

वनविभागाच्या कार्यवाहीत बोरी ( बु. ) येथे फर्निचर जप्त

नांदेड/मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क

मुखेड वनविभागाच्या बेधडक कार्यवाही सत्र सुरूच असुन शेतीतून सागवान लाकडाची विना परवाना तोडणी करुन विनापरवाना वाहतुकीने लाकडे आणून त्याचे फर्निचर साहित्य बनवून साठवन करून ठेवल्याची गुप्त माहीती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती . उप वनसंरक्षक अमोल सातपुते , सहाय्यक वन संरक्षक भीमसिंग ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कंधार परिमंडळातील बोरी बुद्रुक येथे अवैधरित्या साठवून ठेवलेल्या सागवान प्रजातीचे फर्निचर साहित्य कट साईझ लाकडे , चौकटी , सोफासेट व गोल लाकडाचा माल जवळपास ३ घनमीटर अंदाजे ५५ ते ६० हजार रूपयांचे जप्त करण्यात आले . , मुखेड वनपरिक्षेत्र विभागाने जानेवारी २०२२ मध्ये एकाच महिण्यात त्यांच्या कार्यक्षेत्रातील वेगवेगळ्या ३ ठिकाणी धाडी टाकुन धडक कारवाई करण्याचा सपाटा लावला आहे . अवैध सागवान याबाबत पुढील कायदेशीर कारवाई वृक्षतोड करुन विक्री करणाऱ्या करण्याची प्रक्रिया वनपरिमंडळ अधिकारी मुकुंद पवार व वनरक्षक लक्ष्मण पांढुर्णे हे करीत असल्याची माहिती मुखेड चे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.डी. हराळ यांनी दिली आहे . अवैध सागवान वृक्षतोड करून विक्री करणाऱ्या मंडळीचे धाबे दणाणले आहेत . दि . २९ जानेवारी रोजी आंबुलगा बिटातील बोरी बुद्रुक येथे अवैधरित्या विनापरवाना सागवान प्रजातीचा साठवुन ठेवलेला लाकडाचा माल व साहित्य वनविभागाच्या कार्यवाहीत जप्त करण्यात आले . जप्त करण्यात आलेले साहित्य व गोल आकाराचा माल वनपरिक्षेत्र कार्यालयात आणण्यात आला . ही कार्यवाही वनपरिक्षेत्र अधिकारी एस . डी हराळ , वनपरिमंडळ अधिकारी ए.पी. सेवलकर , एम . एम पवार वनरक्षक लक्ष्मण पांढुर्णे , एस व्ही नागरगोजे , आर . के राठोड , ए . एन राठोड , आर . एन कराड , एम जी गोपुलवाड व मेहबूब शेख यांनी केली .

Previous articleनिवासी प्रयोजनासाठी अतिक्रमीत जागा नियमानुकूल करण्यासाठी मंगरूपीर शिवसेना पुढाकार घेणार
Next articleनिर्धार करूया , वाहतुकिचे नियम पाळूया, अपघात टाळूया!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here