Home विदर्भ निर्धार करूया , वाहतुकिचे नियम पाळूया, अपघात टाळूया!

निर्धार करूया , वाहतुकिचे नियम पाळूया, अपघात टाळूया!

161
0

राजेंद्र पाटील राऊत

 

निर्धार करूया ,
वाहतुकिचे नियम पाळूया,
अपघात टाळूया!

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)— रोज वाहन अपघाताच्या बातम्या ऐकून कधीकधी असे वाटते की गतिमान जिवनाची खरेच आपणास गरज आहे का? काही अंशी हे खरे असले तरी या जगण्याचे नियोजन करून आपण आपली दिनचर्या सुखरूपपणे पार पाडू शकतो. यासाठी थोडासा संयम, मनावर ताबा व सवयीमध्ये बदल करून आपण काही अप्रिय घटना टाळू शकतो. यासाठी सर्वांनी वाहतूकिचे नियम कठोरपणे पाळल्यास रस्ता अपघाताचे प्रमाण आपण कमी करू शकतो. मागील घडलेल्या घटनांचा वेध घेतला असता अपघातास वाहनाचा अनियंत्रित वेग , रात्री वाहन चालवितांना न घेतलेली काळजी याचा अभाव जाणवतो.

याबद्दल जनमाणसात जागृती करण्याच्या दृष्टिने स्पंदन फांऊडेशन गडचिरोली व वाहतूक विभाग,पोलीस स्टेशन,गडचिरोली यांच्या सौजन्याने संडे फाॅर सोसायटी या उपक्रमा अंर्तगत शहराच्या मुख्य इंदिरा गांधी चौक तसेच चंद्रपूर रोडवरील आय.टि.आय. चौक व जिल्हा न्यायालय चौक येथे वाहन चालवितांना घ्यावयाची काळजी याबाबतचे माहिती देणारे एकूण ७५ विविध बॅनर लावण्यात आले.

या उपक्रमासाठी डॉ.मिलिंद नरोटे यांच्यातर्फे आवश्यक ते साहित्य पुरविण्यात आले.या कार्याचा शुभारंभ इंदिरा गांधी चौक येथे डाॅ. मिलिंद नरोटे व सहाय्यक पोलिस निरिक्षक पूनम गोरे यांच्यातर्फे बॅनर दाखवून करण्यात आला.

यावेळी अभियंता डाॅ. सुरेश लडके, डॉ. पंकज साकीनालवार, डॉ.प्रशांत चलाख, डॉ.किशोर वैद्य,डॉ. ऊमेश समर्थ,डाॅ.धम्मदिप बोदेले,डाॅ. सौरभ नागूलवार,अभि. महेंद्र बिसेन,अभि.नयन कूल्लरवार,प्रफूल्ल पराते,मोहन मुरकूटे,गौरव निंबार्ते,सुशांत वाटघूरे,प्रशांत चिचघरे,महेश जिलेकार,ऊमेश लोहंबरे,चेतन गोरे तसेच वाहतूक पोलीस विभागातर्फे हेड काॅन्स्टेबल सुनिल हजारे,पोलीस संजय राठोड,सतेज मूंडे,मूकेश चांदेकर,वनिता धूर्वे,शालू मेश्राम,मयूरी कोडाप,शेवंती सुल्वावार,संजय नैताम हे सर्व प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous articleवनविभागाच्या कार्यवाहीत बोरी ( बु. ) येथे फर्निचर जप्त
Next articleराजाराम येथे नागरिकांशी विकास कामांवर चर्चा.. जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांनी जाणून घेतली समस्या..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here